अंबाजोगाई (बीड) - नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्या, अशी मागणी सरकारकडे केली.
आर्थिक मदत देण्याची मागणी -
अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, ज्वारी, आंबे, टरबूज, खरबूज, डाळिंब, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आज आमदार नमिता मुदंडा यांनी सारूळ, जोला, पिंपळगाव, विडा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना फोन करून नुकसानीचे तत्काळ ऑफलाईन पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती केली.
हेही वाचा - मुंबईत रुग्णसंख्येत वाढ सुरूच, 921 नवे रुग्ण, चार मृत्यू