बीड - जिल्ह्यातील धारुर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात सोमवारी (दि. 28 डिसें.) एका प्रकरणात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे न्यायालयासमोर स्वतःहून हजर झाल्याचे पहायला मिळाले.
राज्याचे सार्वजनिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे एका राजकीय प्रकरणातील आरोपी म्हणून उपस्थित होते. दिंद्रुड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या तेलगाव येथे झालेल्या एका विजयी मिरवणूकीत वाद झाला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरिक्षक दिपक पवार यांनी तक्रार देत 24 आरोपीं विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सन 2006 मध्ये नोंदवला होता.
2009 मध्ये आरोप निश्चितीनंतर हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होते. सर्वोच्च न्यायालयाच्या खासदार, आमदार यांच्यावरील खटले वर्षभरात निकाली काढण्याच्या निर्देशानुसार पालकमंत्री धनंजय मुंडे आज (सोमवारी) स्वतःहून न्यायालयात हजर झाले. मंत्री झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे न्यायालयात उपस्थित झाले. न्यायप्रविष्ठ प्रकरणास आजपासून गती येवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षभरात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने या खटल्याचे काम ॲड. जे. बी.बडे पाहत आहेत.
हेही वाचा - वैद्यनाथ कारखान्यातील चोरी प्रकरणात चार जणांना अटक, काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा सामावेश
हेही वाचा - बीड: घरगुती गॅस दरवाढीविरुध्द महिलांची निदर्शने; केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी