ETV Bharat / state

परळी: वैद्यनाथ कारखान्याच्या सभासदांना मिळणार सवलतीच्या दरात साखर; पंकजा मुंडेंची घोषणा

author img

By

Published : Apr 5, 2021, 5:55 PM IST

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला गुढी पाडवा सण जवळ आला आहे. या सणासाठी वैद्यनाथच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखर देण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. प्रति शेअर्स दहा किलो साखर देण्यात येणार असून त्यासाठी प्रति किलो केवळ 25 रुपये दर आकारण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

परळी (बीड) - वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2020-21 ची सांगता नुकतीच संपन्न झाली आहे. गुढी पाडव्याच्या सणासाठी सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. दरम्यान ऐन महत्त्वाच्या सणासाठी केलेल्या या घोषणेमुळे सभासदांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहे.

सवलतीच्या दरात देणार साखर
वैद्यनाथ कारखान्याने हंगाम यशस्वी केला आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला गुढी पाडवा सण जवळ आला आहे. या सणासाठी वैद्यनाथच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखर देण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. प्रति शेअर्स दहा किलो साखर देण्यात येणार असून त्यासाठी प्रति किलो केवळ 25 रुपये दर आकारण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत संबंधित विभागाच्या कार्यालयात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून साखरेचे वाटप केले जाणार आहे.

हेही वाचा-...तर चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या मतदार संघातून निवडणूक लढवतील - मुश्रीफ

हेही वाचा-अनिल देशमुखांवर १०० कोटींचा आरोप ते राजीनामा; संपुर्ण घटनाक्रम वाचा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.