बीड : हुंडा घेण्याची बुरसटलेली मानसिकता समाजात आजही कायम आहे. मुला - मुलींची पसंती झाल्यावर मनासारखा हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडण्यापर्यंत लोक पाऊल उचलतात. काही वेळा आपण लग्न झाल्यावर देखील विवाहितेचे माहेरून हुंड्याची राहिलेली रक्कम घेऊन ये म्हणून तिचा छळ ( Married Women Harassment ) केल्याचे अनेक प्रसार माध्यमातून पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 450 अन्याय अत्याचाराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न : मुलींच्या संसारात विघ्न नको म्हणून माहेरची मंडळी अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. शेतकरी नवरदेवाला शेती किती यावरून हुंड्याची रक्कम ठरवली जाते. तर शिक्षक प्राध्यापक वर्ग 1 वर्ग 2 अधिकारी तसेच इतर सरकारी नोकरदारही हुंडा घेण्यात मागे नाहीत. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिलेले तरुणही हुंड्याची अपेक्षा ठेवतात घर वाहनासाठी बायकोच्या माहेरांच्या मंडळी कडून पैशाची अपेक्षा ठेवतात लग्नामध्ये हुंड्या ऐवजी काहीजण घर, वाहन, प्लॉटची खरेदी माहेरून महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे आण म्हणून विवाहितीकडे ( get house and vehicle ) तगादा लावतात. बीड जिल्ह्यात जवळपास 450 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत 450 तक्रारीची नोंद झाली आहे. कौटुंबिक छळाच्या वाढत्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
बीड पोलिसांकडून कायदेशीर मदत : बीड महिला वरील अत्याचाराच्या अत्याचाराचे गुन्हे घडत असल्याचे आपण पाहत आहोत बीड जिल्हा पोलीस दल महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत अतिशय प्रभावीपणे काम करत आहे त्यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत पिंक पथकाची स्थापना केलेली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली आहे. भरोसा सेल आणि अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात काम करत आहेत, यावेळेस भरोसा सेलकडे 450 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 105 अर्ज यामध्ये संबंधित कुटुंबामध्ये सलोखा घडवून आणलेला आहे. काही अर्जामध्ये आम्हाला तक्रारदार साथ देत नाहीत तर काही अर्ज हे गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन कडे दिले आहेत, समाजामध्ये पुरुषांची मानसिकता बदली गेली पाहिजे, महिलांनी सुद्धा आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या उभं राहिलं पाहिजे व महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे शिक्षण घेऊन स्वतः भक्कम असलं पाहिजे महिला ह्या आर्थिक दृष्टीने सामाजिक व बौद्धिक दृष्टीने सक्षम होतील त्यावेळेस त्यांच्या अन्याय अत्याचार घटना कमी होईल या सर्व गोष्टीला मुलींनी प्रतिकार केला पाहिजे व तक्रार घेऊन पुढे आले पाहिजे व तक्रार झाल्यानंतर जी कायदेशीर मदत आहे ती बीड जिल्हा पोलीस दलाकडून मिळते, असे सुरेखा धस यांनी सांगितले.
हुंडाविरोधी कायदा काय? : हुंडा देण्यास व घेण्यास परवानगी नाही त्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 3 अन्वये कमीत कमी 5 वर्षे शिक्षा व 15 हजार रुपये किंवा हुंड्याच्या मूल्य किमती इतकी जी रक्कम जास्त असेल तेवढ्या दंडाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.