बीड: शेजारच्याचे कुत्रे का भूकले म्हणून रामराज घोळवे यांनी बंदुकीतून घातल्या गोळ्या आहे. विकास हरीभाऊ बनसोडे वय 33 वर्षे व्यवसाय हॉटेल चालक रा. भिमवाडी ता. परळी वै. जि. बीड समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन तोंडी सांगुन फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणचा राहणारा असुन मी आई, वडील व पत्नी असे आम्ही एकत्र राहतात. हॉटेल विर बियरबार किशोर केंद्रे रा. परळी वै. यांचे मागिल 3 वर्षापासुन भाडेतत्वावर चालवुन कुटुंबाची उपजिवीका भागवितो.
धारावतीतांडा शिवारातील घटना: सकाळच्या 11 वाजण्याच्या दरम्यान घरातुन फोरविलर गाडीने हॉटेलवरील कर्मचारी हॉटेलवर आलो असता. वेटर हे हॉटेलवर मुक्कामी असतात. हॉटेल धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी जानार्या रोडवर धारावतीतांडा शिवारात आहे. सकाळी हॉटेलवर आल्यावर माझा वेटर यांनी मला सांगितले की, आपल्या शेजारील आकाड्यावरील राहणारे रामराज कारभारी घोळवे हे बंदुक घेवुन आपले हॉटेलवर आले व आपल्याकडे असलेल्या कुत्रा असे हॉटेलच्या बाहेर होते.
भुलल्यास मी मारुन टाकत असतो: त्याठिकाणी यांच्या समोर रामराज कारभारी घोळवे हे एका पांढ-या रंगाची ज्यावर विटकरी रंगाचे चट्टे असलेल्या कुत्रीला बंदुकीने गोळ्या घालुन निर्दयतेने ठार मारले आहे. आणि मला भुलल्यास मी मारुन टाकत असतो, तेव्हा तेथील घटना बघुन रामराज कारभारी घोळवे रा. परळी यांना फोन करुन विचारले की, तुम्ही माझ्या पाळीव कुत्रीला गोळ्या का मारल्या, तेंव्हा त्यांनी मला सांगितले.
योग्य ती कारवाई: तुमची कुत्री मला भुंकली म्हणुन, मी तिला गोळ्या घालून मारुन टाकले आहे, असे सांगितले आहे. माझ्या पाळीव कुत्रीला विनाकारण बंदुकीच्या गोळीने झाडून ठार मारले आहे. तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ऑफ गुन्हा नोंद झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.