ETV Bharat / state

Sharad Pawars Rally in Beed : साहेब आशीर्वाद द्या..शरद पवारांच्या सभेपूर्वी बीडमध्ये अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी, कार्यकर्ते गोंधळात! - NCP President Public meeting in Beed

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी पहिली सभा येवल्यात घेतली होती. त्या सभेला अनेक लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. बीड शहरात शरद पवार 17 ऑगस्टला दुसरी सभा घेणार आहेत. परंतु शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजित पवार आणि शरद पवार यांचे बॅनर लागले आहेत. यात दोन्ही नेते एकाच बॅनरमध्ये दिसत आहेत. यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीबाबत अजून संभ्रम आहे.

शरद पवारांची बीडमध्ये सभा
शरद पवारांची बीडमध्ये सभा
author img

By

Published : Aug 16, 2023, 8:00 AM IST

Updated : Aug 16, 2023, 10:28 AM IST

बीडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे बॅनर

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटाने बंड केल्यानंतर खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी परवानगीशिवाय आपला फोटो वापरण्यास मनाई केली आहे. प्रत्यक्षात, शरद पवारांचे स्वागत करणारे बॅनर अजित पवार गटाने लावल्याची शहरात चर्चा आहे. या बॅनरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरला आहे. साहेब, बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. आपला माणूस आणि हक्काचा माणूस असे बॅनरमध्ये लिहिले आहे. बीड व महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सदैव दादासोबत असल्याचा बॅनरमध्ये उल्लेख आहे. या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचादेखील फोटो आहे.

कार्यकर्ते संभ्रमात : छत्रपती शिवाजी महाराज चौकात शरद पवार व अजित पवार यांचे एकत्रित बॅनर लागले आहे. यामुळे कार्यकर्ते परत एकदा संभ्रमात पडले आहेत.सभेच्या अगोदरच बीड शहरात साहेब, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. या आशयाचे बॅनर चौकात लागल्याचे पाहायला मिळत आहेत. शरद पवारांची सभा शहरातील माने कॉम्प्लेक्स या भागात होणार आहे. तेथे सभेची जय्यत तयारी सुरू आहे. अशात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असे आशयाची बॅनर लागल्याने बीड शहरातील नागरिकांमध्ये कुजबूज चालू झाली आहे.

धनंजय मुंडे असतील टार्गेट : आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असून ते बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यापासून ते जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सभा घेत आहेत. 17 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची बीड शहरात सभा होणार आहे. या सभेत शरद पवार भाजपासह बंड करणाऱ्या नेत्यांवर शरसंधान करतील असे म्हटले जात आहे बीडमधील राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते धनंजय मुंडे हे अजित पवार गटात गेले आहेत. शरद पवार धनंजय मुंडेंना टार्गेट करतील, असे म्हटले जात आहे. त्याची एक झलक जिल्हाध्यक्ष आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंबेजोगाईत केलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाली.

अप्रत्यक्ष टीका : नुकतेच आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, जे नेते बंड करुन सत्तेमध्ये सामील झाले आहेत, त्यांची पहिली भाषणे कशी होती? सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचे भाषण कसे आहेत, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या भाषणात किती फरक पडला आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत. मी काय खोटे बोलत नाही, असे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.

मी आमदार म्हणून पहिली भूमिका घेतल्यानंतर मला सोशल मीडियावर एकही निगेटिव्ह कमेंट आली नाही. कोणीही या गोष्टीचा विचार करा असे म्हणाले नाही. दुसऱ्यांचे बघितले तर जगाच्या पाठीवर त्यांना काय बोलणे खावे लागले, ते सर्वांनाच माहिती आहे. - आमदार, संदीप क्षीरसागर

हेही वाचा-

  1. Praful Patel Met Nawab Malik : नवाब मालिक कोणासोबत? भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांनी सांगितले...
  2. Sharad Pawar on MVA : 'गुप्त' भेटीमुळे महाविकास आघाडीत संभ्रम नाही; ईडीच्या नोटीसमुळे आमचे काही सहकारी भाजपासोबत गेले - शरद पवार
  3. Sharad Pawar News : शरद पवार व देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर, डॉ. गणपतराव देशमुख स्मारकाचे होणार अनावरण

Last Updated : Aug 16, 2023, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.