ETV Bharat / state

बीडच्या कळसंबरमध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बीडमध्ये बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील नेकनूरपासून आठ किलोमीटरवरील कळसंबर परिससरात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेत नेकनूर येथील शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिबट्याचा हल्ला
बिबट्याचा हल्ला
author img

By

Published : Jun 11, 2021, 9:49 PM IST

बीड - बीडमध्ये बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील नेकनूरपासून आठ किलोमीटरवरील कळसंबर परिससरात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेत नेकनूर येथील शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे कळसंबर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

बीडच्या कळसंबरमध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

परिसरात भीतीचे वातावरण

कळसंबर येथे राहणारे चाळीस वर्षीय आजिनाथ वाघमारे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आजिनाथ हे शेतातून घरी जात असताना अचानक त्यांच्यावर बिबटयाने हल्ला केला. यात ते जखमी झाले. आरडाओरड केल्यामुळे बिबट्या पळाला व त्यांचा जीव वाचला. सध्या या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, दिनेश मोरे, अच्युत तोंडे, श्री डोंगरे व त्यांची टीम दाखल झाली. सध्या पथकाकडून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. परिसरातील नागरीकांनी भीती न बाळगता दक्ष राहावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बिबट्याचा ग्रामस्थांनी काढला व्हिडिओ
बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर त्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे गर्दी केली. यावेळी एका ऊसाच्या शेतातून बिबट्या पळून जातानाचा व्हिडिओ कळसंबर परिसरातील नागरिकांनी काढला आहे.

'घाबरू नका मात्र खबरदारी घ्या'
प्रथमदर्शी बिबट्याच असल्याची शक्यता असून आम्ही संपुर्ण परिसराची पाहणी केलेली आहे. आमचे पथक याठिकाणी 24 तास गस्तीवर असणार आहे. या परिसरातील नागरीकांनी घाबरुन जाऊ नये परंतु सर्वांनी घबरदारी घेण्याची गरज आहे. शेतात एकटे जाणे टाळावे, शेतात ग्रुपमध्ये कामे करावीत, शेतात काम करत असताना मोबाइलमध्ये गाणे लावावीत, गळ्याला काही तरी बांधावे अशा प्रकारे येथील नागरीकांनी घबरदारी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी नागरीकांना केले आहे.

हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार- नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.