ETV Bharat / state

'इंदिरा गांधीनींही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला' मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य - strangle the country

एकेकाळी इंदिरा गांधींनी देखील देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता, असे वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. बीड येथे आयोजित संविधान बचाव महासभेत आव्हाड यांनी हे वक्तव्य केले.

jitendra avhad-indira gandhi
जितेंद्र आव्हाड-इंदिरा गांधी
author img

By

Published : Jan 29, 2020, 8:32 PM IST

Updated : Jan 29, 2020, 8:42 PM IST

बीड - 'एकेकाळी देशात इंदिरा गांधींनी देखील असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता', असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. बीड येथील संविधान बचाव महासभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी देशात आज ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. अनेक महाविद्यालयात हे हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही उपस्थित केला.

मंत्री जितेंद्र आव्हाडांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य... बीड येथील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड

हेही वाचा... संजय राऊतांचे I AM सॉरी ! इंदिरा गांधींबद्दलचे विधान घेतले मागे

'आज देशातील परिस्थिती पाहता, इंदिरा गांधींनीही असेच लोकशाहीचा गळा एकेकाळी घोटण्याचा प्रकार केला होता. देशात त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीबाबत बोलायला कोणीही तयार नव्हते. परंतु अहमदाबाद आणि पटना येथील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्या धोरणाविरोधात आवाज उठवला. त्याचकाळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल' असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एकही अपशब्द खपवून घेणार नाही; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा

जेव्हा देशातील आजची परिस्थिती बदलेल तेव्हा त्याचे श्रेय जेएनयु, हैद्राबाद यूनिवर्सिटी यांना द्यावे लागेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले. आज विद्यार्थी बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. लोकांना कायदा समजावून सांगत आहेत. आज जरी त्यांची संख्या कमी असेल, तरिही हळूहळू ती वाढेल आणि हेच विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

Intro:इंदिरा गांधीनी देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता; राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बीडमध्ये वक्तव्य..

बीड- देशाचा इतिहास साक्षी आहे इंदिरा गांधी यांनी देखील एकदा असाच देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी बीडमध्ये केले. ते बीड येथील संविधान बचाव महासभेत बोलतं होते.

इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न कसा झाला होता याबाबत सांगताना ते म्हणाले की, तेंव्हा देशात कोणीही बोलायला तयार नव्हतें. परंतु अहमदाबादच्या व पटना येथील विद्यार्थ्यानी इंदिरा गांधी यांच्या धोरणाविरोधात आवज उठवला. त्याचकाळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल. यांचे श्रेय जें एन यु, हैद्राबाद यूनिवर्सिटी ला द्यावा लागेल असेही ते यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थी बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगतं आवज देत आहेत, आज संख्येने कमी दिसतात हळू हळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील.असा विश्वास महाराष्ट्राचे ग्रूह निर्मानमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. एकंदरीतच मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे इंदिरा गांधी यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांच्या विचाराच्या नागरिकांच्या निश्चितच भावना दुखवू शकतात.
Body:बConclusion:ब
Last Updated : Jan 29, 2020, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.