परळी वैजनाथ (बीड) : राज्यामध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कालच मंत्रीमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये कडक लॉकडाऊनचे संकेत या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. परळी ते गंगाखेड रस्त्यावरील धर्मापुरी नाक्यावर पोलीस प्रत्येक येणाऱ्या वाहणांची कसून चौकशी करत आहेत. ऐरवी पोलिसांचे प्रमाण कमी असते. मात्र आता पोलिसांचा फौज फाटा वाढविलेला आहे. येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे, नंतरच वाहन पुढे सोडले जाते आहे. यावरून आता जिल्हा प्रशासन सतर्क झाल्याचे दिसत आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने धर्मापुरी नाक्यावर तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, पोलीस उपअधिक्षक सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज जिरगे, पोलीस नाईक हरिदास गित्ते, शिवाजी गोपाळघरे, किशोर घोळवे, दिपक लव्हारे, किशोर गायकवाड, अनंत भोसले, गडदे आदी कर्मचारी बंदोबस्त तैनात आहेत.