ETV Bharat / state

International Womans Day 2023: महिला, आरोग्य हा कळीचा मुद्दा; महिलाच्या आरोग्यावर देशाचे आरोग्य अवलंबून - महिलांचे आरोग्य

महिलांचे आरोग्य हा एक कळीचा मुद्दा आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीच्या आरोग्याच्या बाबतीतच्या तक्रारी दूरच राहिले आहे. महिलांच्या आरोग्याच्या बाबतीतही हेच घडत आहे. महिला जर आजारी असेल तर तिच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. तिला वेळेला ट्रीटमेंट देणे व तिची काळजी घेणे, आपण एकविसाव्या शतकात पाहत आहोत की, महिला सशक्तिकरणाचा काळ चालू आहे, पण महिलांच्या आरोग्य विषयी काही बदल झालेले दिसत नाहीत.

International Womans Day 2023
स्त्रीच्या आरोग्यावर देशाचे आरोग्य अवलंबून
author img

By

Published : Mar 6, 2023, 2:43 PM IST

Updated : Mar 8, 2023, 6:20 AM IST

महिलाच्या आरोग्यावर देशाचे आरोग्य अवलंबून

बीड : प्रत्येक कुटुंबात महिला हा महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र त्यांच्या समस्या मात्र अनेक काळापासून तशाच आहेत. आजही जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे. मात्र महिलांच्या आजारवर मात्र ठोस पावले उचलले जात नाहीत. एखादा आजार झाल्याच्या नंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजार होऊ नये याच्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असते. त्याच्यासाठी ताज्या पाले भाज्या, फळ, ज्वारी, बाजरी, खजूर यासारखे पदार्थ आहारात असणे गरजेचे असते. आता फास्ट पुढचा जमाना आहे. यामुळे अनेक महिलांना याचा सामना आयुष्यात करावा लागत आहे. मात्र याच्यावर उपाय प्रत्येकाच्या जवळ आहे. मात्र करण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे.

महिलांच्या समस्या: महिला अजूनही त्याच समस्यांना फेस करत आहे. नैसर्गिक रित्या माहिला आणि पुरुष हे विभिन्न आहेत. महिला आणि पुरुषांचे आजारही वेगवेगळे आहेत. महिला बाबतीत तिचा गरोदरपणा असेल, तिची मासिक पाळी असेल, तिची प्रसूती असेल किंवा तिचा मेनोपॉज असेल या वेगवेगळ्या स्टेज मधून महिला जात असतात. तेव्हा तिला त्या वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. महिलांशी निगडित हे आजार असतात. महिलांच्या आरोग्यावर समाजाने विचार करणे गरजेचे आहे.

30 टक्के महिलांना हे आजार: शहरी आणि ग्रामीण भागातील माहिलांनमध्ये वेगवेगळे आजार आहेत. शहरी भागामध्ये 40 वर्षाच्या आतीलच महिलांना सांधे दुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. तिच्यामध्ये अनेमियाचे प्रमाण कमी असते. तर वर्किंग वुमन आहे. त्यांना घर सांभाळावे लागते त्याचबरोबर त्यांना त्यांचे आरोग्य ही सांभाळावे लागते. घरातील लहाना माणसापासून मोठ्या माणसापर्यंत व सर्व बारीक सारीक कामाकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. त्या मात्र स्वतःकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्या न्यूट्रिशन मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो. महिलांना अनिमिया यासारख्या डिफेन्स मध्ये जावे लागते.आपल्याकडील 30 टक्के महिला ह्या त्यांना स्तनाचे कॅन्सर झालेले आहेत. गर्भाशयाचे आजाराचे प्रमाण शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याची कारणे पण वेगवेगळी आहेत. त्यांची बदललेली लाईफ स्टाईल त्यामुळे गर्भाशय रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर डायबिटीज, हायपर टेन्शन, स्थूलपणा, वजन वाढणे, पीसीयुडी यासारखे अनेक आजार महिलांमध्ये वाढताना दिसत आहेत, यासारखे प्रमाण शहरी भागातील महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी भागामध्ये अनेक स्त्रिया या तीस वर्षाच्या पुढेच लग्न करत आहेत, त्यानंतर त्या ठरवतात मूल होऊ द्यायचे की नाही, फास्ट फुडचा जमाना आहे. लवकर मुलं राहण्यासाठी सुद्धा त्याचा त्रास होतो.

ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या: बीड शहरामध्ये उपोषणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. गरोदर महिला जर आमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली तर ती अगोदरच कुपोषित असती आणि तिचे जन्मणार मूल सुद्धा ते कुपोषितच जन्मते. त्यामुळे या कुटुंबात कुपोषणात जन्मलेली मुले ही कुपोषितच असतात. तिला अनिमिया असतो विटामिन फेसन्सी असते, महिला जर कुपोषित असेल तर जन्मणार मूल सुद्धा कुपोषित जन्मले जाते. या कुपोषित बाळाच्या आरोग्याकडे कुणी लक्ष देत नाही. सुदृढ आणि पौष्टिक आहार लहान बालकाला मिळत नाही. त्यामुळे ती सुद्धा खुरटीच राहतात.

असा घ्या आहार: घरामधील महिला जर सशक्त असेल तर ती घरातील सर्वच मंडळीकडे लक्ष देते. जर एखादी स्त्री आजारी असेल किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर ती त्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करते. आहारात बदल करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे. आपल्याकडे पिकणार जी धान्य आहे त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये फार महत्त्व आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी आता त्याच्यावर संशोधन होत आहे. बाजरी या पिकामध्ये सर्वात जास्त पौष्टिक घटक आहेत. ते गहू तांदळापेक्षाही जास्त पौष्टिक घटक बाजरीमध्ये आहे. हे पीक महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जात सदृढ राहायचे असेल तर बाजरी, ज्वारी ,फळ, पाले भाज्या गुळ शेंगदाण्याचे लाडू सफरचंद, डाळिंब, द्राक्ष, खजूर, याचे सेवन जर तुम्ही तुमच्या आहारात केले तर तुमचा आजार नक्कीच पळून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम केला पाहिजा. त्यामध्ये चालणे, पळणे किंवा जिम अटेंड करणे असेल, चांगला आहार आणि व्यायाम जर केला तर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची आवश्यकता पडणार नाही.

हेही वाचा: International Womans Day 2023 महिला दिन विशेष दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारी महिला

Last Updated : Mar 8, 2023, 6:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.