ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात एक हजार बेड्सची व्यवस्था करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना - Beed Corona News

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा आरोग्य विभागाला आरोग्य यंत्रणा तगडी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही ते म्हणाले.

पालकमंत्री धनंजय मुंडे
पालकमंत्री धनंजय मुंडे
author img

By

Published : Apr 12, 2021, 8:36 PM IST

बीड - दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. पुढील उपाय योजनांच्या संदर्भात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यादरम्यान मंत्री मुंडे यांनी बीड जिल्ह्यात नव्याने 1 हजार बेडची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

सर्वांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले आहे - धनंजय मुंडे
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, आ. सुरेश धस, आ. संजय दौंड, आ. बाळासाहेब आजबे, आ. नमिता मुंदडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते आदींची उपस्थिती होती. यादरम्यान पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा आरोग्य विभागाला आरोग्य यंत्रणा तगडी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. तसेच रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही मुंडे म्हणाले. त्याचबरोबर "येत्या आठवड्याभरात बीड जिल्ह्यात एक हजार बेड ची संख्या वाढवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिक असो की, शहरी भागातील सर्वांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी न घाबरता कोरोना आजाराशी लढा द्यावा, योग्य ते आरोग्य उपचार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याचेही" मंत्री मुंडे म्हणाले.

पालकमंत्री धनंजय मुंडे
नियम पाळणे महत्त्वाचे-
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. अनावश्यक कामासाठी घराच्या बाहेर पडू नये, अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. जर नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही, असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
बीड जिल्ह्यातील कोरेनाची सद्यस्थिती-
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक शहरे कोरोनाचे हॉट-स्पॉट झाले आहेत. बीड जिल्ह्यात आज घडीला एकूण बेडची संख्या 5 हजार 56 एवढी आहे. सक्रिय रुग्ण 3815 आहेत. जिल्ह्यातील कोविड सेंटर ची संख्या 59 एवढी आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे 1, बीड जिल्हा रुग्णालय येथे 1, तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे 3, याशिवाय स्वतंत्र कोविड सेंटर 19 व इतर ठिकाणी उर्वरित कोविड सेंटर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.