बीड: ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूकीच्या तोंडावर युवकांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, (Jayadatta Kshirsagar) युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर (MLA Sandip Kshirsagar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या (GramPanchayat Election) पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे.
बीड मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते, विरोधकांना कंटाळून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंगळवारी चौसाळ्यातील युवा कार्यकर्त्यांनी तर बुधवारी नवगण राजुरी येथील रविंद्र वाघ, विशाल बनकर आदि युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री क्षीरसागर, युवा नेते योगेश भैय्याच्या गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी रामचंद्र बहीर, मारूती वाघ, वैजीनाथ बनकर आदि उपस्थित होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते अकार्यक्षम नेत्याच्या कारभाराला कंटाळून विकासाभिमूख नेत्याच्या गटात जाहीर प्रवेश करू लागले आहेत.
कार्यकर्ते जोमात: ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू असतानाच बीड विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांचे अनेक कार्यकर्ते आ.संदीप क्षीरसागर (MLA Sandip Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल होत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे बळ प्राप्त होताना दिसत आहे. बीड तालुक्यातील चौसाळा व कानडी घाट येथील विविध पक्षांच्या ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामपंचायत सदस्य संजित माने,पंजाब बारगुळे,दादाराव कळासे, शैलेश सोनावणे,पोपट कळसकर यांच्यासह येथील जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब झोडगे,निवांत झोडगे, शिवाजी झोडगे, सुभाष झोडगे, योगीराज झोडगे, मयूर झोडगे, सतीश कुडके, अक्रूर गवळी आदी शिवसेनेच्या मुळ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
तसेच कानडी घाट येथील चौसाळा गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या प्रयागबाई सखाराम काकडे, गणेश काकडे यांच्या गावातील कार्यकर्त्यांनीही आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह डॉ.बाबु जोगदंड, सयाजी शिंदे, विजय नवसेकर, नाना जोगदंड, श्रीमंत सोनवणे, शिकूर सौदागर आदींची उपस्थिती होती. प्रवेशाबद्द्ल आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधितांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.