ETV Bharat / state

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन 4 वर्षांपासून घरात डांबून ठेवलेल्या पत्नीची अखेर सुटका - पतीने पत्नीला 4 वर्षांपासून ठेवले घरात डांबून

बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर या महिलेचा 20 वर्षांपूर्वी मनोज याच्याशी विवाह झाला. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीचे दोन-तीन वर्ष आनंदात गेले. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. ती एका दुकानावर कामाला जात होती. मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झाले.

पीडित महिलेची सुटका
पीडित महिलेची सुटका
author img

By

Published : Apr 12, 2022, 7:56 PM IST

बीड - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. या नराधम पतीने पीडित महिलेला मारहाण देखील केलेली आहे. तसेच दोन मुलं देखील दहशती खाली आहेत. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज (मंगळवारी) सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली. यावेळी त्या महिलेची अवस्था पाहून अक्षरशः सामाजिक कार्यकर्त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले.

बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर या महिलेचा 20 वर्षांपूर्वी मनोज याच्याशी विवाह झाला. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीचे दोन-तीन वर्ष आनंदात गेले. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. ती एका दुकानावर कामाला जात होती. मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झाले. गेल्या 17 वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत, संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते. त्यानंतर आज बाहेर निघाले माझी मुलं आहेत. मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण देखील करत असल्याचे पीडित महिलेने सांगितले.

या सगळया प्रकाराबाबत सांगताना त्या महिलेचे शेजारी म्हणाले की, तो तिला घराच्या बाहेरही निघू देत नव्हता. एवढेच नाही तर वडील मरण पावले तर अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही. पोटच्या मुलांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे. याने जिवंत महिला कोंडून ठेवली हे आम्ही गेल्या 10 वर्षांपासून पाहतो आहे. अशी प्रतिक्रिया शेजारीनी दिली आहे. पीडित महिला व तिची दोन मुलं राहत होती. त्यांची आम्ही सुटका केली असून पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांनी रोष व्यक्त करत आरोपी पतीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - नवरदेवाला गंडविणाऱ्या टोळीची सदस्या जेरबंद, बनावट लग्न लावून अनेकांना फसवले

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.