ETV Bharat / state

होमिओपॅथीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पुण्यात बैठक - डॉ.अरुण भस्मे - होमिओपॅथी शास्त्र

महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शास्त्रातील होमिओपॅथीला उच्चतम स्थान प्राप्त करून देण्यासाठी रविवारी (दि. २८ जुलै) पुण्यात देशपातळीवरील बैठकीचे आयोजन केल्याची माहिती केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.अरुण भस्मे यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शास्त्रातील होमिओपॅथीला उच्चतम स्थान प्राप्त करून देण्यासाठी रविवारी (दि. २८ जुलै) रोजी पुण्यात देशपातळीवरील बैठकीचे आयोजन केल्याची माहिती केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.अरुण भस्मे यांनी दिली.
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:33 PM IST

बीड - येत्या काळात महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शास्त्रातील होमिओपॅथीला उच्चतम स्थान प्राप्त करून देण्यासाठी रविवारी (दि. २८ जुलै)ला पुण्यात देशपातळीवरील बैठकीचे आयोजन केल्याची माहिती केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांनी दिली. देशभरातील सर्व राज्यांत होमिओपॅथी शास्त्राला मानाचे स्थान आहे. मात्र, महाराष्ट्र शासन राज्यातील होमिओपॅथी शास्त्राचा गांभीर्यतेने विचार करत नसून, ही खेदाची बाब असल्याचे डॉ. भस्मे यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीतून आम्ही महाराष्ट्रातील होमिओपॅथी शास्त्राला राजाश्रय मिळवून देण्याबाबत पुढील दिशा ठरवणार आहोत. यापूर्वी शासनाकडे डॉ. सावरीकर शासकीय समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती. परंतू, शासन याबाबत उदासीन आहे, असे त्यांनी सांगितले.

CHO च्या 5716 जागांच्या भरतीला स्थगिती देऊन, त्यामध्ये होमिओपॅथीक डॉक्टरांच्या समावेशासाहीत जागा भराव्यात. तसेच प्रत्येक PHC मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून या डॉक्टरांचा समावेश करण्यात यावा व राष्ट्रीय बाल स्वाथ योजनेमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समाविष्ट करावे, अशा प्रमुख मागण्या यामार्फत करण्यात आल्या आहेत.

संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून शासनाकडे विविध मागण्या करण्यात येत आहेत. यामध्ये होमिओपॅथीचे स्वतंत्र संचलनालय सुरू करण्यासाठी वेलनेस सेंटरवर होमिओपॅथीक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, यांतील चिकित्सकांना मेडिकल/फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मिळावे, शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे होमिओपॅथी कॉलेज सुरू करावे, अशा विषयांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त कम्युनिटी हेल्थ या योजनेत होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करून घेणे, CCMP पास डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी ताबडतोब करणे, आदी मागण्यांचा समावेश असल्याचे डॉक्टर अरुण भस्मे यांनी सांगितले.

Intro:महाराष्ट्रात होमिओपॅथी ला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पुण्यात बैठक; डॉ. अरुण भस्मे यांची माहिती

बीड- देशात इतर राज्यांमध्ये होमिओपॅथी शास्त्राची चांगली ओळख व स्थिती आहे. मात्र महाराष्ट्रात होमिओपॅथीला राजमान्यता दिली असली तरी राजाश्रय मिळत नाही. या पुढच्या काळात महाराष्ट्रात होमिओपॅथीला उच्चतम स्थान प्राप्त करून देण्यासाठी रविवारी पुण्यात देशपातळीवरील बैठक घेत असल्याची माहिती केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

राष्ट्रीय स्तरावर इतर राज्यांमध्ये होमिओपॅथीला शासनाने राजमान्य ते बरोबर राजाश्रय देखील दिलेला आहे आमच्या संघटनेकडून अनेक वर्षापासून आम्ही शासनाकडे विविध मागण्या करत आहोत असे असतानाही शासन महाराष्ट्रातील होमिओपॅथी शास्त्राचा विचार करत नाही ही खेदाची बाब आहे आम्ही आता रविवारी 28 जुलै रोजी पुणे येथे देशव्यापी बैठक घेऊन महाराष्ट्रातील होमिओपॅथी शास्त्राला राजाश्रय मिळवून देण्याबाबत पुढील दिशा ठरवणार आहोत यापूर्वीच आम्ही शासनाकडे खालील मागण्या केलेल्या आहेत यामध्ये डॉ. सावरीकर शासकीय समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी,
CHO च्या 5716 जागांच्या भरतीला स्थगिती देऊन त्यांमध्ये होमिओपॅथीक डॉक्टरांचा समावेश करुन भरती करा,
प्रत्येक PHC मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून होमिओपॅथीक डॉक्टरांचा समावेश करण्यांत यावा, राष्ट्रीय बाल स्वाथ योजनेमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश करावा,
होमिओपॅथिचे स्वतंत्र संचलनालय सुरू करण्यासाठी, वेलनेस सेंटरवर होमिओपॅथिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, होमिओपॅथिक चिकित्सकांना मेडिकल सर्टिफिकेट /फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे अधिकार मिळणेबाबत, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे होमिओपॅथी कॉलेज सुरू करणेबाबात, कम्युनिटी हेल्थ या योजनेत होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करून घेणे बाबत, CCMP पास डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी ताबडतोब करावी. आदी मागण्यांचा समावेश असल्याचे डॉक्टर अरुण भस्मे यांनी सांगितले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.