ETV Bharat / state

गेवराईच्या महाआरोग्य शिबिराचा गरजूंना आधार; हजारो रुग्णाची मोफत तपासणी अन् शस्त्रक्रिया

गेवराई येथील राष्ट्रवादी शिवजयंती उत्सव समिती यांच्या विशेष पुढाकारातून व बीड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीर गेवराई येथे सुरू आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून योग्य औषधोपचार देऊन शस्त्रक्रिया केल्या आहेत.

author img

By

Published : Mar 5, 2020, 9:16 AM IST

health camp gevrai beed
गेवराईच्या महाआरोग्य शिबिराचा गरजूंना आधार

बीड - जिल्ह्यातील गेवराई येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया केली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. 12 ते 15 हजार रुग्णांची तपासणी केलेले हेच शिबीर 31 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाचशे शस्त्रक्रिया मोफत करण्याचे उद्दिष्ट आहे.

गेवराईच्या महाआरोग्य शिबिराचा गरजूंना आधार; हजारो रुग्णाची मोफत तपासणी अन् शस्त्रक्रिया

गेवराई येथील राष्ट्रवादी शिवजयंती उत्सव समिती यांच्या विशेष पुढाकारातून व बीड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीर गेवराई येथे सुरू आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून योग्य औषधोपचार देऊन शस्त्रक्रिया केल्या आहेत. या महाआरोग्य शिबिरात दोनशेहून अधिक वेगवेगळ्या आजारासंबंधीच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. या शिबिरात डोळ्यांची शस्त्रक्रिया, गर्भ पिशवी शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन तसेच इतर लहान आजारासाठी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

केवळ डोळ्यांच्या 90 शस्त्रक्रिया आतापर्यंत झाल्या आहेत. या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश शिंदे यांनी सांगितले.

पाचशे शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट - डॉ. अशोक थोरात

गेवराई येथे केवळ ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. उपलब्ध असलेल्या यंत्रणेवरच महाआरोग्य शिबिराची मदार असल्याचे सांगत डॉक्टर थोरात म्हणाले की, 30 मार्चपर्यंत वेगवेगळ्या पाचशे आजाराच्या शस्त्रक्रिया करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक ती आरोग्य यंत्रणा उभी केलेली आहे. या महाआरोग्य शिबिरामुळे गेवराई तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.