ETV Bharat / state

Navodaya Exam News: बीडमध्ये शिक्षकांच्या चुकीमुळे नवोदयच्या मराठी माध्यमाच्या परीक्षेला गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका; विद्यार्थ्याचे वर्ष गेले वाया

नवोदयच्या मराठी माध्यमाच्या परीक्षेला गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. त्यामुळे विद्यार्थी पेपर देऊ शकला नाही. यावर विद्यार्थ्याने आपले वर्ष वाया गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Navodaya Exam News
नवोदय परीक्षा
author img

By

Published : Apr 30, 2023, 2:23 PM IST

नवोदय परीक्षा

बीड : शनिवारी बीड जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कालिकादेवी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यात खोकरमोहा येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा नवोदय पात्रता परीक्षा फॉर्म भरताना शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांला गुजराती माध्यमात फॉर्म भरण्यात आला. त्यामुळे त्याला गुजराती माध्यमाच्या प्रवेशपत्राबरोबर त्याला गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आली. ज्याला गुजरातीचा कुठलाच अभ्यास नसल्याने त्या विद्यार्थ्याला शिक्षकांच्या चुकीने तोच पेपर सोडवावा लागल्याचा प्रकार घडला.

गुजराती माध्यमाचा पेपर : शनिवारी परीक्षा केंद्रावर गेलो असता मला गुजराती भाषेचा पेपर मिळाला. वर्षभर केलेला अभ्यास वाया गेला. माझे यामध्ये खूप मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संदीप मुळीक याने दिली. शनिवारी माझ्या मुलाची नवोदयची परीक्षा होती. शिरूर येथील कालिंका विद्यालय येथे, तो खोकरमोह जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याचा पेपर शिरूर येथील कालिका विद्यालय येथे होता. तो मराठी माध्यमाचा असताना त्याला गुजराती माध्यमाचा पेपर देण्यात आला, त्याला ते समजत नव्हते. म्हणून मी त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांशी संपर्क केला.

वर्ष वाया गेले : सर त्याला गुजराती माध्यमाचा पेपर आलेला आहे. सरांनी सांगितले की, आतमध्ये अ‍ॅडजेस्ट केले जाते. माझा मुलगा बाहेर आल्यानंतर मुलाला विचारले की, मला गुजराती भाषेमधील पेपर आला होता. आता त्याचे नुकसान झाले आहे. त्याची प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे. त्याने नवोदयसाठी वर्षभर अभ्यास केलेला होता, सरांच्या चुकीमुळे वर्ष वाया गेले आहे. त्याचे मला खूप वाईट वाटत आहे, शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, हे चुकून झालेले आहे. आम्ही मुद्दामहून केलेले नाही, पण त्याचे वर्ष वाया गेले आहे.

उडवा-उडवीची उत्तरे : याविषयीची मी तुम्हाला अगोदरच कल्पना दिली होती. त्यावर आम्ही अ‍ॅडजेस्ट करू, आता विषय सोडून द्या, असे शिक्षकांनी उडते उत्तर दिले. त्यामुळे माझा मुलगा परीक्षेपासून वंचित राहिला आहे, असे पालक सखाराम मुळीक यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्याध्यापक राम वाघुंबरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संगणकाची चूक आहे. आता काय करू तुम्हाला जे करायचे ते करा, असे उडवा-उडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा : पेट परीक्षेच्या निकालात गोंधळ : मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.