बीड - चक्क चौथीत शिकणाऱ्या पोटच्या मुलीचे तीस हजार रुपये घेऊन एका 20 वर्षीय मुलासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न अघड झाला आहे. मुलीच्या निर्दयी आई-वडिलांना वेळेत माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे हा बालविवाह टळला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील फुलेनगर भागात घडली आहे. या प्रकरणी तीन महिलांसह सहा जणाना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा- भाजपची तटस्थ भूमिका? शिवसेना करणार सत्तास्थापनेचा दावा
या मुलीचे लग्न धारूर तालुक्यातील एका मुलाशी लावून देण्याचे ठरवले होते. लग्नाची सगळी खरेदी देखील झाली होती. लग्नासाठी नवरा-नवरीला देखील सज्ज करण्यात आले होते. मात्र, याचवेळी या बालविवाहाची खबर माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुलेमान पठाण यांना मिळाली. त्यानी हा बालविवाह टाळला. पोलिसांनी यातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. याची माहिती माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी दिली.