बीड - बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका 17 वर्षीय मुलीने सौताडा येथील धबधब्या वरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. सदर घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटोद्याच्या रुग्णालयात दाखल केला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकरांनी फेटाळला बलात्काराचा आरोप; पत्रकार परिषद घेऊन देणार स्पष्टीकरण
शुभांगी लक्ष्मण शिंदे (वय 17) ही बारावी वर्गाची मुलगी बुधवारी रात्री अचानक घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध नातेवाईकांनी घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर गुरुवारी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्यात तिचा मृतदेह आढळून आला. तिने रात्रीच धबधब्यावरून उडी मारली असावी. त्यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी पाटोदा पोलीस ठाण्याचे तांबे व तांदळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याविषयी चा अधिक तपास पाटोदा पोलीस ठाण्याचे तांबे व तांदळे हे करत आहेत.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट-
17 वर्षीय शुभांगी हिने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली? याचे नेमके कारण अद्याप पर्यंत अस्पष्ट आहे. या प्रकरणात काही घातपात आहे का? याचा तपास पाटोदा पोलीस करत आहेत.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक