ETV Bharat / state

गेवराई रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा, अशी गत झाली आहे.

उपजिल्हा रुग्णालय, गेवराई
author img

By

Published : Nov 18, 2019, 2:34 PM IST

बीड - जिल्ह्यातील गेवराई येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. संबंधित काही डॉक्टरांच्या सतत गैरहजेरीमुळे खासगी रुग्णालयात रुग्ण जात असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र गेवराई उप जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी सूचना देऊनही संबंधित यंत्रणा आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. यामुळे गेवराई येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालय असून अडचण नसून खोळंबा असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शल्य चिकित्सक यांच्या विशेष प्रयत्नांतून आलेली हाडांच्या शस्त्रक्रियेची मशीन, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेली मशीन देखील धुळखात पडून आहे. गरोदर महिलांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गरीब रुग्णाच्या खिशाला झळ बसत आहे. या रूग्णालयात सोनोग्राफीसाठी मोठी गर्दी असते. मात्र, रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णांच्या हाती चिठ्ठी देऊन त्यांना खासगी रुग्णालयात पाठवितात. परिणामी खासगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना पैसे खर्च करावे लागत आहेत.

रेफरचे वाढले प्रमाण
अपघातग्रस्त, सर्पदंश, विषारी औषध आदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोडीफार मलमपट्टी तसेच तपासून रुग्णांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयाकडे 'रेफर' केले जाते. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असून सर्वसामान्य रूग्णांना आर्थिक फटका बसत आहे.

हेही वाचा - बीडमध्ये कुजलेल्या मृतदेहाची राख अन् हाडावरुन पोलिसांनी लावला खुनाचा छडा

Intro:शल्य चिकित्सक यांनी सूचना देऊनही गेवराईत आरोग्य सेवेचा बोजवारा; गरीब रुग्णांना जावे लागतेय खाजगी रुग्णालयात

बीड- जिल्ह्यातील गेवराई येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. संबंधित काही डॉक्टरांची सतत गैरहजेरी असल्यामुळे खाजगी रुग्णालयात रुग्ण जात असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र गेवराई उप जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सूचना देऊनही संबंधित यंत्रणा आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

शल्य चिकित्सक यांच्या विशेष प्रयत्नातून आलेली हाडांच्या शस्त्रक्रिये ची मशीन, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेली मशीन देखील धुळखात पडून आहे. गरोदर महिलांची मोठी हेळसांड होत आहे. संबंधित डॉक्टर त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात आधार घ्यावा लागत आहे यामुळे गरीब रुग्णाच्या खिशाला झळ बसत आहे. ५० खाटांचे रुग्णालय असल्याने दाखल करावयाच्या अनेक रुग्णांची सोनोग्राफी करावी लागते. मात्र रुग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिलेली सोनोग्राफी मशीन बंद आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णांच्या हाती चिठ्ठी देऊन त्यांना खासगी रुग्णालयात पाठवितात. परिणामी खासगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना पैसे खर्च करावे लागत आहेत.

रेफर चे वाढले प्रमाण-
अपघातग्रस्त, सर्पदंश, विषारी औषध आदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोडीफार मलमपट्टी तसेच तपासून रुग्णांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयाकडे 'रेफर' केले जात आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असून सर्वसामान्य रूग्णांना आर्थिक फटका बसत आहे.
Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.