ETV Bharat / state

बीड: हुतात्मा परमेश्वर जाधवर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - शहीद परमेश्वर जाधवर अंत्यसंस्कार

जैसलमेर येथे युध्द् सरावादरम्यान धारुर तालुक्यातील घागरवडा येथील परमेश्वर बाळासाहेब जाधवर हे हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद परमेश्वर जाधवर
author img

By

Published : Nov 21, 2019, 10:27 PM IST

बीड - राजस्थानमधील जैसलमेर येथे युध्द् सरावादरम्यान धारुर तालुक्यातील घागरवडा येथील परमेश्वर बाळासाहेब जाधवर यांना वीरमरण आले आहे. परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव गुरुवारी त्यांचे मूळ गाव घागरवाडा येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद परमेश्वर जाधवर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

याप्रसंगी माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, धारुरचे नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी, आमदार प्रकाश सोळुंके, तहसीलदार एस. व्ही. शेडोळकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, पोलीस निरीक्षक विश्वास नाईकवाडे, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी, गटविकास अधिकारी सोपान अकेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींनी जाधवर यांना श्रध्दांजली वाहिली.

हेही वाचा - औरंगाबादच्या नाट्यगृहांची अवस्था चांगली करा - मकरंद अनासपुरे

अहमदनगरच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर स्कूलमधील सुभेदार सत नारायण, सुभेदार जी. एस. शेखावत यांच्या पथकाच्यावतीने परमेश्वर जाधवर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी परिसरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Intro:शहिद परमेश्वर जाधवर यांच्या पार्थिवावर झाले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बीड- राजस्थान जैसलमेर येथे युध्द सरावा दरम्यान धारुर तालुक्यातील घागरवडा येथील परमेश्वर बालासाहेब जाधवर हे शहिद झाले. परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव आज गुरुवार दि. 21 नोव्हेबर 2019 रोजी त्यांचे मूळ गाव घागरवाडा येथे आणण्यात आले आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी माजलगाव उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, धारुर नगराघ्यक्ष स्वरुपसिंह हजारी, आमदार प्रकाश सोळुंके, तहसिलदार एस. व्ही. शेडोळकर, माजी खा. आनंदराव अडसूळ, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, पोलीस निरीक्षक विश्वास नाईकवाडे, नायब तहसिलदार सुहास हजारे, रामश्वर स्वामी, गटविकास अधिकारी सोपान अकेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पालवे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शासकीय माध्यम क्षेत्रातील व्यक्ती आदींनी पुष्पचक्र व पूष्प वाहून श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी आर्मड एसीसी अँड स्कूल अहमदनगर येथील गार्ड ऑफ ऑनर सुभेदार सत नारायण, सुभेदार जी. एस. शेखावत यांच्या पथकाच्यावतीने बंदूकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. शहिद परमेश्वर बालासाहेब जाधवर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी धारुर तालूका आणि परिसरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरीक जमा झाले होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.