ETV Bharat / state

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जवानावर गुन्हा दाखल - शिवाजीनगर पोलीस

आरोपीचे १० जूनला लग्न होणार होते. मात्र, त्याला लग्नाच्या एक दिवसापूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकावे लागले.

आरोपीला नेताना पोलीस
author img

By

Published : Jun 11, 2019, 9:44 AM IST

बीड - लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका जवानावर अॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधीत आरोपीचे १० जूनला लग्न होणार होते. मात्र, त्याला लग्नाच्या एक दिवसापूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकावे लागले.

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या जवानावर गुन्हा दाखल

जिल्ह्यातील वडवणी येथील आरोपी प्रदीप राजाभाई मुंडे सैन्यदलात कार्यरत आहे. वडवणी येथेच त्या पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या घराच्या मागे या आरोपीचे घर आहे. गेल्या २ वर्षांपूर्वी जवान सुट्टींवर आल्यानंतर त्या दोघांची भेट झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याने गेल्या २ वर्षांपासून त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते.

गेल्या २८ एप्रिलला आरोपी बीडला त्या तरुणीच्या घरी आला होता. त्याने तिच्या घरी मुक्कामदेखील केला. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान मे महिन्यात आरोपीचे एका मुलीबरोबर लग्न जमले आणि साखपुडाही झाला. त्यानंतर आता १० जूनला त्याचे लग्न होते. ही माहिती पीडितेला समजल्यानंतर तिला धक्का बसला. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी बीडमध्ये जवानावर गुन्हा दाखल; लग्नाच्या बेडीत अडकण्या ऐवजी हातात पोलिसांच्या बेड्या

बीड- मागील दोन वर्षापासून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी बीडमध्ये एका जवानावर ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी चे 10 जून रोजी लग्न ठरले होते. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदर आरोपीला फराळ व्हावे लागले आहे. लग्नाच्या बेडीत अडकणार ऐवजी हा तरुण व सैन्य दलातील जवानाच्या हाती पोलिसांच्या बेड्या अडकल्या आहेत.

Body:याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की सैन्यदलात कार्यरत असलेला प्रदीप राजाभाऊ मुंडे (रा. वडवणी) असे आरोपीचे नाव आहे. मागील दोन वर्षापासून 20 वर्षीय पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला मुलगी वडवणी येथे गेले असता तिच्या नातेवाईकांच्या घराच्या पाठीमागे या सैन्यदलातील जवानाचे घर होते. जवान सुट्टीवर आल्यानंतर या दोघांची भेट झाली होती. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी 28 एप्रिल 2019 रोजी पुण्याहून बीड ला आला होता. त्याने मुलीच्या घरी दोन दिवस मुक्काम केले. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान मे महिन्यात प्रदीपचे एका मुलीबरोबर लग्न जमले साखरपुडा ही झाला होता. शिवाय 10 जून रोजी तो विवाह करणार होता. ही माहिती कळल्यावर पीडितेला धक्का बसला. तिच्या तक्रारीवरून बलात्कार व ॲट्रॉसिटी नुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Conclusion:या घटनेचा पुढील तपास उपअधीक्षक भास्कर सावंत हे करत आहेत.

लग्नाच्या एक दिवस आगोदरच नवरदेव फरार-
प्रदीप मुंडे याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी त्याचे लग्न होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रदीप फरार झाला आहे. लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी हातात पोलिसांच्याच बेड्या पडल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.