बीड - सासरवाडीरून पत्नीसह दोन मुलांना घेऊन घराकडे कार क्रमांक एम.एच १४ डी.एक्स.१३०४ ने येत असताना पाटोदा जवळील एका वळणावर कार वेगात असल्याने ताबा सुटुन झालेल्या अपघातात पतीचा जागीच मुत्यु One dies after car overturns in Beed झाला. तर पत्नी सह दोन मुले जखमी Three people were injured झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. किशोर निवृत्ती सापते वय वर्ष ३२ असे मयत झालेल्या तरूणांचे नाव आहे.
कार उलटली - आष्टी तालुक्यातील बावी येथील किशोर निवृत्ती सापते हा पत्नी व दोन मुले यांना घेऊन सोमवारी लिंबागणेश येथे सासरवाडीला गेले होते.एक दिवस मुक्काम करून मंगळवारी त्याना चारचाकी कार क्रमांक एम.एच. १४,डी. एक्स.१३०४ ने घेऊन गावाकडे येत असताना पाटोदा येथे एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला. यात कार उलटल्यामुळे झालेल्या अपघातात पती किशोर निवृत्ती सापते वय ३२ वर्ष हा जागीच ठार झाले. तर, पत्नी मनिषा व दोन मुले जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली आहे. शोकाकुल वातावरणात किशोर यांच्यावर बावी येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.