बीड - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसासह वादळाने हजेरी लावली. ठिक-ठिकाणी गारपीठही झाली. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हैरान झालेल्या शेतकऱ्यांना आता वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न सतावत आहे.
सध्या रब्बीचा हंगाम आहे. काही शेतकर्यांच्या शेतातील ज्वारी, गहू, हरभरा काढून पडला आहे. तर, काही शेतकऱ्यांची पिके अजूनही शेतातच उभी आहेत. रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीठही झाली. त्यामुळे, शेतात उभी असलेली गहू व ज्वारीची पीके आडवी झाली आहेत. तर, हरभऱ्याच्या झाडाचे घाटे गळून गेले आहेत. नुकसान झाल्यामुळे आता वर्षभर खायचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा-अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा; धनंजय मुंडेंचे निर्देश