ETV Bharat / state

..अन् शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधातील आंदोलन तासाभरातच गुंडाळले

धनंजय मुंडे यांनी जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र ना कारखाना सुरू झाला, ना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांनी एवघ्या एका तासातच गुंडाळले. त्यामुळे चर्चेला पेव फुटले आहे.

आंदोलक शेतकरी
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:36 PM IST

Updated : Jul 1, 2019, 8:51 PM IST

बीड - जगमित्र साखर कारखान्यासाठी जमिनी घेतल्याने धनंजय मुंडे यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. मात्र या शेतकऱ्यांनी एक ते दीड तासातच हे आंदोलन गुंडाळल्याने चर्चेला पेव फुटले आहे. हे आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना भाग तर पाडले नाही, ना अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

आंदोलक शेतकरी

मागील अनेक वर्षापासून धनंजय मुंडे यांनी फसवणूक केल्याबाबतचा विषय गाजत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आम्हाला प्रलोभन दाखवून आमच्याकडून जमीन लिहून घेतल्या. त्या जमिनीचा सौदा ज्या भावात झाला होता, ते पैसे देखील आम्हाला आजपर्यंत मिळालेले नाहीत. मुलाला नोकरी देऊ असा शब्द तेव्हा जमीन घेताना दिला होता. मात्र तो शब्द देखील पाळला नाही. एकंदरीतच आमची फसवणूक झाली आहे. आमच्या जमिनी पुन्हा आम्हाला परत द्या, अशी मागणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी उद्धव कचरू सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर नऊ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आंदोलक शेतकऱ्यांनी योग्य मागणी केलेली असली, तरी अवघ्या काही तासातच हे आंदोलन त्या शेतकऱ्यांनी मागे घेतले. यावरून उलट सुलट चर्चा देखील झाली. हे आंदोलन शेतकऱ्यांनी केले, की या शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास जाणीवपूर्वक भाग पाडले, याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर माणिक भालेराव, दिगंबर पवार, उद्धव सावंत, संजय सावंत, शांताबाई सावंत, यमुनाबाई भालेराव, लखन भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Intro:धनंजय मुंडे यांच्या विरोधातील आंदोलन तासभरातच गुंडाळले

बीड- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जगमित्र शुगर फॅक्टरी सुरू करायची म्हणून आमच्याकडून जमिनी घेतल्या. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ना फॅक्टरी सुरू केली ना आमच्या मुलांना नोकरीला घेतले. ठरल्याप्रमाणे आमच्या जमिनीचे पैसे देखील दिले नाहीत असे आरोप करत अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील शेतकरी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन केले. मात्र अवघ्या एक ते दीड तासात आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावरून हे आंदोलन करण्यासाठी भाग पाडले आहे की काय? याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात झाली.

Body:मागील अनेक वर्षापासून धनंजय मुंडे यांनी फसवणूक केल्या बाबतचा विषय गाजत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आम्हाला प्रलोभन दाखवून आमच्याकडून जमीन लिहून घेतल्या. त्या जमिनीचा सौदा ज्या भावात झाला होता ते पैसे देखील आम्हाला आज पर्यंत मिळालेले नाहीत. मुलाला नोकरी देऊ असा शब्द तेव्हा जमीन घेताना दिला होता. मात्र तो शब्द देखील पाळला नाही. एकंदरीतच आमची फसवणूक झाली आहे. आमच्या जमिनी पुन्हा आम्हाला परत द्या, अशी मागणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी उद्धव कचरू सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर नऊ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Conclusion:आंदोलक शेतकऱ्यांनी योग्य मागणी केलेली असली तरी अवघ्या काही तासातच हे आंदोलन त्या शेतकऱ्यांनी मागे घेतले यावरून उलट सुलट चर्चा देखील झाली. हे आंदोलन स्वतः शेतकऱ्यांनी केले की, या शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास जाणीवपूर्वक भाग पाडले याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर माणिक भालेराव, दिगंबर पवार, उद्धव सावंत, संजय सावंत, शांताबाई सावंत, यमुनाबाई भालेराव, लखन भालेराव आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत.
Last Updated : Jul 1, 2019, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.