ETV Bharat / state

आत्‍महत्‍येचे सत्र सुरुच, कर्जाला कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या - बीड

दुष्काळामुळे नापिकी व त्यातून उद्भवलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 50 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

आत्‍महत्‍येचे सत्र सुरुच, कर्जाला कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : May 30, 2019, 3:11 PM IST

बीड- दुष्काळामुळे नापिकी व त्यातून उद्भवलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 50 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंजनवती येथे गुरुवारी घडली. बबन श्रीपती शिंदे (रा. अंजनवती ता. जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बबन श्रीपती शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 10 लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज फेडायचे कसे? असा बबन शिंदे यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्याबरोबरच दुष्काळामुळे दिवसेंदिवस शेतीतून जास्त उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे नैराश्यातून बबन शिंदे यांनी गुरुवारी रोळगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बबन शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व 4 विवाहित मुली, असा परिवार आहे. बबन शिंदे यांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:खालील बातमीचा फोटो मेल केला आहे

**************

बीडमध्ये कर्जाला कंटाळून 54 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

बीड- दुष्काळामुळे जमिनीची नापिकी व त्यातून उद्भवलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 50 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंजनवती येथे गुरुवारी घडली आहे.

Body:बबन श्रीपती शिंदे (रा. अंजनवती ता. जि. बीड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, बबन श्रीपती शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 10 लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज फेडायचे कसे? असा बबन शिंदे यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता. दुष्काळामुळे दिवसेंदिवस शेतीची परिस्थिती बिघडत चालली होती. अशा स्थितीत बँकेचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न बबन शिंदे यांच्यासमोर निर्माण झाला होता. यातून आलेल्या नैराश्यामुळे बबन शिंदे यांनी रोळगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली.

Conclusion:बबन शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार विवाहित मुली असा परिवार आहे. बबन शिंदे यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.