बीड - पंकजा मुंडे यांनी सत्तेत असताना मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवला नाही आणि आता सत्ता गेल्यानंतर आंदोलन करत आहेत, असा टोला शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
हेही वाचा - पंकजा मुंडे यांनी पाच वर्षांत केवळ भाषणबाजीच केली - बाळासाहेब थोरात
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवला जावा या मागणीसाठी पंकजा मुंडे औरंगाबाद येथे एकदिवसीय आंदोलन करत आहेत. बीड येथील शेतकरी नेते थावरे यांनी पंकजा मुंडे यांच्या आंदोलनावर टीका करताना म्हटले आहे की, "भाजप सरकारच्या काळात स्वतः पंकजा मुंडे मंत्री होत्या. मात्र त्या मंत्री असताना मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला नाही. हातातून सत्ता गेली आणि चार दिवसातच मुंडे यांना मराठवाड्याचा कळवळा आला आहे" पंकजा मुंडे यांचे हे आंदोलन मराठवाड्यासाठी नाही तर, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी असल्याचा आरोपही थावरे यांनी यावेळी केला आहे.