बीड : रात्री तीन वाजता बाजाराच्या ठिकाणी जायचे होते. पहाटे लवकर उठून पाण्याचे हिटर बाथरूममध्ये लावले व कोलगेट ब्रश करत ज्ञानेश्वर सुरवसे पत्नीला बाकीची आवराआवर करण्याची सांगत बाथरूमकडे आंघोळीसाठी गेले. तर त्या ठिकाणी त्यांना त्या हिटरचा शॉक बसला. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी सिंधुबाई सुरवसे या त्यांच्याकडे धावत गेल्या. तर यांना विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांनी त्यांना पकडले. दोघांचा देखील विजेचा शॉक लागला व दोघेही मरण पावले. ही घटना पिंपळगाव परिसरात पसरताच नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आहे. तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.
नातेवाईकांनी फोडला टाहो : ही घटना माहीत होताच त्यांची मुलगी व नातेवाईकांनी टाहो फोडलेला. अत्यंत कष्टाळू व गरीब कुटुंबातील असल्याने अनेक दिवसांपासून हॉटेल व्यवसाय करत असल्याने परिसरातील नागरिकांचाही संपर्क मोठा होता. त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून आपली उपजीविका भागवायचे. त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय त्यांनी चालू ठेवला होता. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा : थंडीच्या दिवसात अनेकांना अंधोळीसाठी गरज पाण्याची गरज असते. काही लोक स्टील आणि जर्मनच्या बादल्या पाणी गरम करण्यासाठी वापरतात. त्यामुळे वॉटर हीटर रॉडला आतमध्ये टाकल्यानंतर शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गरम पाणी करताना प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा. एक छोटीसी चुकी सुध्दा तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. काही लोक स्टील आणि जर्मनच्या बादल्या पाणी गरम करण्यासाठी वापरतात. त्यामुळे वॉटर हीटर रॉडला आतमध्ये टाकल्यानंतर शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गरम पाणी करताना प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा.
बादलीत टाकल्यानंतर बटन सुरु करा : बरेच लोक वॉटर हीटर रॉडचा वापर अत्यंत चुकीच्या पद्धतीने करतात. म्हणजे बटन सुरु केल्यानंतर बादलीमध्ये टाकतात. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. वॉटर हीटर रॉडला लागलेली घाण वेळोवेळी साफ करायला हवी, कारण लागलेली घाण साफ केली नाहीतर वॉटर हीटर रॉड पाणी गरम करण्यास अधिक उशीर लावतो. एक चुकही जीवावर बेतली जावू शकते. त्यामुळे काळजी घ्या.