बीड : आपण पाहतोय की वाढदिवस म्हटलं की ढोल ताशे मोठे मोठे बॅनर, शाल श्रीफळ त्याचबरोबर गुलालांची उधळण, जेसीबीला लावून हार नेत्यांना घातले जातात. मात्र, आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या 200 प्रति वाटप केल्या आहेत.
संविधान ग्रंथ भेट : आमदार सुरेश धस यांचा वाढदिवस साजरा करीत असताना, पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा संस्था त्याचबरोबर आदर्श वाचनालय या सर्वांना संविधान ग्रंथच देत आहोत. साठी आम्ही प्रत्येक गावा गावांमध्ये जाऊन या ग्रंथाचे वाटप करणार आहोत, वाढदिवस जरी नेत्याचा असला तरी जागर मात्र संविधानाचा आहे असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. संविधान वाचलं पाहिजे या देशातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे. संपूर्ण देश हा सही संविधानावर चालतो.
ग्रंथाचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा : ग्रामीण भागामध्ये आपण नुसतं संविधान संविधान म्हणतो मात्र भागातील विद्यार्थ्यांना मात्र हा ग्रंथ सहजासहजी उपलब्ध होत नाही, हा ग्रंथ या चिमुकल्याच्या हातात दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. या ग्रंथांमध्ये नेमकं आहे तरी काय त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे. निश्चितच या ग्रंथाचा सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त आमच्या हातामध्ये संविधानाचा ग्रंथ दिलेला आहे, आम्ही फक्त आतापर्यंत संविधान वाचत होतो, तो ग्रंथ आम्ही सरांकडून घेऊन संविधानाचं वाचन करू. त्याप्रमाणे तो आचरणात आणू व त्याप्रमाणे वागू आणि हा ग्रंथ आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया अंजली वादगे या विद्यार्थींनीने दिली आहे.
तर सोनाली कवठेकर या विद्यार्थिनी म्हणटे आहे की, फक्त संविधानाचे काही पण आम्ही वाचली होती. मात्र, आम्हाला प्रत्यक्षात आता हा ग्रंथ आमच्या हातात आलेला आहे. आम्हाला त्याचा फार आनंद होत आहे. त्यामुळे आम्ही हा ग्रंथ वाचू तो आचरणात आणू आणि त्याप्रमाणे वागू. या संविधान ग्रंथातील अर्थ आम्ही समजून घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
आज आज नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम न घेता एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांपर्यंत लोकांना संविधानाची नुसती पत्रिका न वाटता ग्रंथाच्या माध्यमातून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये संविधान येत आहे. खऱ्या अर्थाने या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे याचा उलगडा निश्चितच खऱ्या अर्थाने होईल, जे शाळेमध्ये संविधान दिला आहे ते आम्ही प्रत्येक पानाचे वाचन आम्ही प्रत्येक दिवसाच्या परिपाठामध्ये केलं जाईल असे शिक्षक वारभुवन चंद्रकांत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Nana Patole On Ajit Pawar : सत्यजित तांबे प्रकरण अजित पवारांनी चव्हाट्यावर आणले; नाना पटोले यांचा आरोप