ETV Bharat / state

भगवान गडावर धनंजय मुंडेंचे भव्य स्वागत, राज्याची सेवा करण्यासाठी शक्ती देण्याचे घातले साकडे - धनंजय मुंडे भगवानगडावर

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भगवानगडाचे दर्शन घेतले. यासोबतच, सामान्यांची श्रद्धास्थाने आणि शक्तिस्थाने असणार्‍या या गडांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करू, राज्याची सेवा करण्यासाठी भगवानबाबांनी आपल्याला शक्ती द्यावी असे साकडे घातले.

भगवान गडावर आले असता बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

author img

By

Published : Jan 10, 2020, 8:03 AM IST

बीड - अध्यात्मिक गड ही सामान्यांची श्रद्धास्थाने असतात. याठिकाणी राजकारण होणार नाही, तर केवळ विकासकारण होईल. सामान्यांची श्रद्धास्थाने आणि शक्तिस्थाने असणार्‍या या गडांचा विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करू, राज्याची सेवा करण्यासाठी भगवानबाबांनी आपल्याला शक्ती द्यावी. असे साकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला घातले. मंत्री झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नारायणगड आणि गहिनीनाथ गडासह पाथर्डीमधील भगवानगडाचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

भगवान गडावर आले असता बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

भगवान गडावर धनंजय मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. यावेळी त्यांच्यासमवेत आ. प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ. अमरसिंह पंडित यांची उपस्थिती होती. मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगवानगड भेटीला मोठे महत्त्व आहे, त्यांना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी 'मंत्रिपदाची शपथ घेऊन भगवानगडावर या' असे निमंत्रण दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर गेले होते. या ठिकाणी त्यांचे भक्त परिवाराने जंगी स्वागत करत, त्यांना १११ किलोचा हार घालण्यात आला. यावेळी गडावर मोठ्या प्रमाणावर भक्त परिवार उपस्थित होता.

मंत्री मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंतांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, 'चार वर्षांपूर्वी या गडावर भक्तांनी आपल्या गाडीवर दगडफेक केली होती. मात्र, आज त्याच भगवानगडाने आपल्याला आशीर्वाद दिले आहेत, हे मी माझ्यासाठी महत्त्वाचे समजतो. आपण गडावर राजकारण कधीच केलेले नाही, यापुढेही गडाच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू’.

हेही वाचा - 'इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, गडाच्या विकासासाठी सदैव तत्पर'

तत्पूर्वी मुंडे यांनी नारायणगडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतले. याठिकाणी महंत शिवाजी महाराज आणि विश्वस्त मंडळाने मुंडे यांच्यासह आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित यांचे स्वागत केले. या ठिकाणी बोलताना मुंडे आणि आ. क्षीरसागर यांनी गावावर आता विकासकारण होईल असे सांगितले.

हेही वाचा - बीडमध्ये एसटी बसची मोटार सायकलला धडक, दोन जण जागीच ठार

Intro:भगवानगडावर धनंजय मुंडेंचे भव्य स्वागत
राज्याची सेवा करण्यासाठी शक्ती देण्याचे घातले साकडे

बीड- अध्यात्मिक गड हे सामान्यांची श्रद्धास्थाने असतात. याठिकाणी राजकारण होणार नाही , तर केवळ विकासकारण होईल. सामान्यांची श्रद्धास्थाने आणि शक्तिस्थाने असणार्‍या या गडांचा विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करू, राज्याची सेवा करण्यासाठी भगवानबाबांनी आपल्याला शक्ती द्यावी असे साकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला घातले. मंत्री झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी बीड जिल्ह्यातील नारायणगड आणि गहिनीनाथ गडासह पाथर्डीमधील भगवानगडाचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. भगवानगडावर धनंजय मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत झाले.

यावेळी त्यांच्यासमवेत आ. प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ. अमरसिंह पंडित यांची उपस्थिती होती. मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगवानगड भेटीला मोठे महत्व आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी ’मंत्रिपदाची शपथ घेऊन भगवानगडावर या’ असे निमंत्रण दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर गेले होते. याठिकाणी त्यांचे भक्त परिवाराने जंगी स्वागत केले. त्यांना 111 किलोचा हार घालण्यात आला. यावेळी गडावर मोठ्याप्रमाणावर भक्त परिवार उपस्थित होता. धनंजय मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर म्हणतांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी ,’ चार वर्षांपूर्वी या गडावर भक्तांनी आपल्या गाडीवर दगडफेक केली होती, आज त्याच भगवानगडाने आपल्याला आशीर्वाद दिले आहेत, हे मी माझ्यासाठी महत्वाचे समजतो. गडाचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आपण गडावर राजकारण कधीच केलेले नाही, यापुढेही गडाच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू’ असे धनंजय मुंडे म्हणाले. तत्पूवी धनानंजय मुंडे यांनी नारायणगडावर जाऊन नगद  नारायणाचे दर्शन घेतले. याठिकाणी महंत शिवाजी महाराज आणि  विश्वस्त मंडळाने धनंजय मुंडे यांच्यासह आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित यांचे स्वागत केले. याठिकाणीही धनंजय मुंडे आणि आ. संदीप क्षीरसागर यांनी गावावर आता विकासकारण होईल असे सांगितले.

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.