बीड - माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात स्व. मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
'अप्पा, ऊसतोड कामगार बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. ऊसतोड कामगार बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन, हा शब्द देतो. आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याच्या वतीने कालच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्यातील दहा जिल्ह्यातील 41 तालुक्यात 82 मुलामुलींची वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 10 तालुक्यात एकूण वीस वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस मंजुरी देण्यात आली होती. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे.
स्वर्गीय मुंडे साहेबांचा लोकसेवेचा वसा आणि वारसा पुढे चालवणार - धनंजय मुंडे - धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे
लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात स्व. मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.