मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच बीडमध्ये आज जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका (Sharad Pawar Attacked Dhananjay Munde ) केली आहे.
मुंडेही भाजपाच्या दावनीला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये सभेत बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार टीका केल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते अनेक वर्षे राष्ट्रवादीचे नेते म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादीत असताना त्यांनी भाजपावर सातत्याने हल्लाबोल केला होता. मात्र आता धनंजय मुंडेही भाजपाच्या दावनीला बांधले आहेत, असे टिकास्त्र शरद पवारांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर (State Agriculture Minister Dhananjay Munde) सोडले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले की, तुम्हाला शरद पवारांच्या भाषणाचा काय अर्थ लावायचा तो लावा.
सत्ताधारी पक्षाचे मणिपूरकडे दुर्लक्ष : मणिपूरचा प्रश्न गंभीर आहे. ईशान्येकडील राज्ये छोटी पण खूप महत्त्वाची आहेत. शेजारी चीन, पाकिस्तान देशाचा आपल्या राज्यावर डोळा आहे. संकट आल्यास काय होईल याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे भारतीय लष्कराला सतर्क राहावे लागेल, असे पवार यांनी म्हटले आहे. मणिपूरमध्ये समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे, हिंसाचार होत आहे, घरे जाळली जात आहेत, उद्योगधंदे बंद होत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत. हे होत असताना देशातील सत्ताधारी पक्ष काहीच करत नाही. समाजातील लोकांना दिलासा देण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची गरज होती, मात्र ते तिथे गेले नाहीत, असे पवार म्हणाले.
पवारांच्या भूमिकेबाबत राजकीय संभ्रम : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर बीडमध्ये शरद पवार यांची ही पहिलीच सभा होती. या सभेत शरद पवार पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर गटासह केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी त्यांचे पुतणे अजित पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला होता.
हेही वाचा -