ETV Bharat / state

'पाच वर्षात मला खलनायक म्हणून हिणवलं; पण अखेर सत्याचाच विजय झाला' - beed political news

'मागील पाच वर्षात मला खलनायक म्हणून हिणवलं, सर्वत्र माझी बदनामी केली, पण अखेर सत्याचाच विजय झाला', असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. शुक्रवारी (दि.10जाने) जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला.

dhananjay munde commented in beed
मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
author img

By

Published : Jan 11, 2020, 8:49 AM IST

Updated : Jan 11, 2020, 9:44 AM IST

बीड - 'मागील पाच वर्षात मला खलनायक म्हणून हिणवलं, सर्वत्र माझी बदनामी केली, पण अखेर सत्याचाच विजय झाला', असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. शुक्रवारी (दि.10जाने) जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंवरही भाष्य केले. एखाद्याचे वैचारिक वारसदार होणे चुकीचे आहे का, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. तसेच 'मी जरी गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्मलो नसलो, तरी त्यांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार आहे', असे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बीडच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यावर माझा भर असणार आहे, असे मुंडे म्हणाले.

हेही वाचा : ..अन् पुन्हा दिसून आला धनंजय मुंडेंचा संवेदनशीलपणा

मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे बीडमध्ये आले होते. त्यांनी पहिली आढावा बैठक घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यंदा शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेण्यासाठी एकही खासगी कंपनी समोर आली नाही. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. यावर सविस्तर चर्चा झाली असून संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा आदेश धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

Intro:पाच वर्ष मला खलनायक म्हणून हिनवल पण, अखेर सत्याचाच विजय झाला- धनंजय मुंडे

बीड- मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात मला खलनायक म्हणून हिनवले सर्वत्र माझी बदनामी केली. अखेर सत्याचाच विजय झाला. एखाद्याचे वैचारिक वारसदार होणे चुकीचे आहे का ? मी जरी गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्माला आलो नसलो तरी त्यांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार आहे. असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शुक्रवारी बीड जिल्हा प्रशासनात कडून विविध विकास कामांचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना धनंजय मुंडे यांनी दिला.

Body:नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान चे शब्द मी बीड जिल्ह्यातील जनतेला दिले आहेत. ते शब्द पूर्ण करण्याचे आव्हान मी स्वीकारलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील विकास कामांना कशी गती देता येईल येईल. यावर माझा भर असणार आहे. मिळालेल्या मंत्रीपदाचा जिल्ह्यासाठी राज्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Conclusion:मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे बीड शहरात आले होते. त्यांनी पहिली आढावा बैठक घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदा शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेण्यासाठी एकही कंपनी खाजगी कंपनी समोर आली नाही. त्यामुळे शेतकरी नुकसानीच्या भरपाई पासून वंचित आहे. यावर काय तोडगा काढायचा याची सविस्तर चर्चा झाली असून याचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे जिल्हाधिकारी बीड यांनी पाठवावा असे आदेश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
Last Updated : Jan 11, 2020, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.