ETV Bharat / state

बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही वाळूचे दर दुप्पटच! - बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही वाळूचे दर दुप्पटच

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना वाळू कमी भावात मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारून देखील वाळूचे दर दुप्पट झाल्याने याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही वाळूचे दर दुप्पटच!
author img

By

Published : Aug 20, 2019, 8:55 AM IST

बीड - जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना वाळू कमी भावात मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती आता महाग झाल्याचेच समोर येत आहे. १ महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत बऱ्याच गाड्या जप्त केल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारून देखील वाळूचे दर दुप्पट झाल्याने याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही वाळूचे दर दुप्पटच!

जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, बीड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू पट्टे आहेत. दीड महिन्यापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गेवराई तालुक्यातील राजेगाव येथील वाळू घाटावर कारवाई करत शेकडो ब्रास वाळू जप्त केली. दरम्यान वाळू वाहतुकदारांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येत असलेल्या हप्त्याबाबत जाहीर निवेदन देऊन प्रशासनाचा खोटा कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर वाळू वाहतूकदारांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला व वाळू जप्त केली. या कारवाईनंतर बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी वाळू योग्य भावात मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पूर्वी ६ ब्रास वाळू ३० हजार रुपयात मिळत होती. आता ३ ब्रास वाळुसाठी २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात.

जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्या कारवाईनंतर बांधकामासाठी माफक दरात वाळू मिळेल. अशी अपेक्षा होती मात्र, आजही वाळू चढ्या भावाने विक्री केली जात आहे. मागील महिनाभरापूर्वी वाळू माफियांवर झालेल्या कारवाईचा सर्वसामान्य नागरिकांना काय लाभ झाला? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Intro:जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाई नंतरही वाळूचे दर दुप्पटच

बीड- जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना कमी भावात वाळू मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्रा वस्तुस्थिती वेगळी आहे. 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत शेकडो ब्रास वाळू जप्त केली होती, या कारवाई नंतर घर- बांधकाम करणाऱ्या नागरिकांना योग्य भावात वाळू मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु कारवाईनंतर वाळूचे दर दुप्पटच झाले असल्याचे वास्तव बीड जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारून देखील वाळू चढ्या भावात सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करावी लागत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Body:बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू पट्टे आहेत. दीड महिन्यापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गेवराई तालुक्यातील राजेगाव येथील वाळू घाटावर कारवाई करत शेकडो ब्रास वाळू जप्त केली. याच दरम्यान वाळू वाहतूकदारांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येत असलेल्या हप्त्या बाबत जाहीर निवेदन देऊन जिल्हा प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली होती. यावरून वाळू वाहतूकदार यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला व वाळू जप्त केली. अवैध वाहतूक रोखण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर देखील केला. या कारवाईनंतर बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी वाळू योग्य भावात मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पूर्वी 6 ब्रास वाळू तीस हजार रुपयात मिळत होती. आता तीन ब्रास वाळू ला 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. चढ्या भावाने वाळू विक्री होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

Conclusion:जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्या कारवाईनंतर बांधकामासाठी माफक दरात वाळू मिळेल. अशी अपेक्षा होती मात्र आजही वाळू चढ्या भावाने विक्री केली जात आहे. मागील महिनाभरापूर्वी वाळू माफिया वर झालेल्या कारवाईचा सर्वसामान्य नागरिकांना काय लाभ झाला? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.