ETV Bharat / state

Female Sacrifice for Black Magic : गुप्तधनासाठी बळी देण्याकरता चक्क बापाकडे केली 16 वर्षांच्या मुलीची मागणी; गुन्हा दाखल - Secret Money

Female Slaughtering Plan : बीडच्या पाटोदा तालुक्यातील कोतन गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Human Slaughtering for secret money) यामध्ये एका भोंदू बाबानं गुप्तधन काढण्याकरता कन्याबळी देण्याचा डाव रचला. वाचा पूर्ण बातमी...

Female Slaughtering Plan
गुप्तधन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 4:01 PM IST

Updated : Oct 26, 2023, 4:37 PM IST

कन्याबळीचा डाव कसा फसला याविषयी माहिती देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य

बीड Female sacrifice for black magic : बीडच्या पाटोदा तालुक्यातील कोतन गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Human sacrifice for secret money) यामध्ये एका भोंदू बाबानं गुप्तधन काढण्याकरिता कन्याबळी देण्याचा डाव रचला होता. (Secret Money superstition) यासाठी त्याने गावातील भाऊसाहेब गरवकर यांच्याकडे त्यांच्या 16 वर्षीय मुलीची मागणी केली होती. (Human sacrifice) मुलगी दे अन्यथा तुमचे कुटुंब नष्ट करू, अशी धमकीही भोंदू बाबाने दिली होती. अखेर भाऊसाहेब यांनी थेट अमळनेर पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. (Bhondu Baba)

गुप्तधनासाठी तुमची 16 वर्षांची मुलगी द्या. तिचा बळी देऊन गुप्तधन काढतो असं सांगणाऱ्या एका भोंदू बाबा विरोधात बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव घोशिर या भोंदू बाबानं पुणे येथे असलेले गुप्तधन काढण्यासाठी अघोरी उपाय सांगितला. त्यासाठी गावातील भाऊसाहेब गरवकर यांना तुमची 16 वर्षांची मुलगी मला द्या. तिला सजवायचे आहे, नटवायचे आहे आणि तिचा बळी द्यायचा आहे मग गुप्तधन मिळेल. त्यातील काही धन तुम्हाला देतो असं आमिष दाखवलं. तसंच ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुमच्या घरादाराला नष्ट करू, अशी धमकी देखील दिली.

यानंतर भाऊसाहेब यांनी थेट अमळनेर पोलीस ठाणे गाठून भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुप्तधनासाठी कन्याबळी देण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोतन गावच्या गावकऱ्यांनी बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला देखील कळवलं आहे; परंतु या घटनेमुळं कोतन गावामध्ये भीतीचं वातावरण आहे.

हेही वाचा:

  1. Child Slaughter For Secret Money : गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न, मांत्रिकासह सात जणांना अटक
  2. Nanded Crime: गुप्तधन शोधण्यासाठी मुख्याध्यापकाने शेतात मांडली पूजा; गावकऱ्यांनी थेट पोलिसच बोलवले
  3. जालन्यातील बदनापूर येथे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न फसला, 3 अटकेत

Last Updated : Oct 26, 2023, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.