बीड : टिकटॉक स्टार संतोस मुंडेंच्या (tik tok star ) निधनाने जिल्हा भरात हळहळ व्यक्त ( grief expressed throughout district over death ) केली जाते. संतोस मुंडे यांचा मृत्यु विद्युत विभागाच्या हलगर्जीपणा मुळे झाला. गावात भर चौकात असलेल्या विद्युत रोहितरच्या आर्थिंगला विद्युत प्रवाह उतरला संतोष मुंडे शेतातून काम करून घरी येत असताना गावाच्या चौकात आसलेल्या डीपीला कृष्णा मुंडे यांचा स्पर्श झाला. कृष्णा मुंडे यांना वाचवण्यासाठी आलेल्या संतोष मुंडे यांचाही जागीच मृत्य झाला आहे.
एकाचवेळी दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार : राज्यातून मुंडेंच्या चाहत्यांनी भोगलावडी गावात प्रचंड गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने चाहते नातेवाईक गावकरी पंचक्रोशीतील नागरिक संतोष मुंडेंना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले होते. संतोष मुंडेसह कृष्णा मुंडे या दोघांच्या पार्थिव शरीरावर एकाचवेळी बीड जिल्ह्यातील भोगलावडी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
महावीतरन विभागाच्या गाकथान कारभारामुळे घडली घटना : संतोष मुंडे यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी भाऊ,आई वडील असा परिवार आहे संतोष मुंडेंच्या आणि कृष्णा मुंडेंच्या जाण्याने परिवार चिमुकल्यांचे छत्र हरवले आहे. दरम्यान भाजपचे नेते रमेश आडसकर बाबरी मुंडे हे देखील मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी दोघांनाही श्रद्धांजली वाहिली तसेच ही घटना महावीतरन विभागाच्या गलथान कारभारामुळे घडली आहे. त्यामुळे संतोष मुंडे आणि कृष्णा मुंडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन भाजपा नेते रमेश आडसकर आणि बाबरी मुंडे यांनी दिले आहे.