ETV Bharat / state

Children Drowned in Lake : खेळता-खेळता शेततळ्यातील पाण्यात उतरले; बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू - Children Death In Farm Lake At Beed

खेळता-खेळता शेततळातील पाण्यात उतरलेल्या तीन चिमुकल्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथे मंगळवारी उघडकीस आली. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुले आठ ते पाच वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे.

Children Drowned In Farm Lake At Beed
तीन चिमुकल्यांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 21, 2023, 8:20 PM IST

बीड: केज पासून १५ कि. मी. अंतरावर असलेल्या सावळेश्वर पैठण येथील शेतात असलेल्या शेततळ्यात हौस म्हणून उतरले असावे. मात्र, पोहणे येत नसल्याने ते खोल पाण्यात बुडाले, असा अंदाज बांधल्या जात आहे. या दुर्घटनेत स्वराज जयराम चौधरी, पार्थ श्रीराम चौधरी, श्लोक गणेश चौधरी या तीन लहान मुलांचा समावेश आहे. घटना नेमकी कशी घडली हे अद्याप समजू शकले नाही. तरी युसुफवडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

गावांवर शोककळा: ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने बीड जिल्ह्यातील गावांवर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळाकडे युसुफवडगाव पोलिसांनी धाव घेतली आहे.

जालना शहरातही अशीच घडना उघडकीस: जालना शहरातील मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी एका १४ वर्षीय मुलासह बापाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना एप्रिल, 2022 रोजी घडली होती. दुपारी पाचच्या सुमारास ही घटना घडली. माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आकाश निर्वंळ आपल्या तीन नातेवाईकासह मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना आपला मुलगा बुडत असल्याचे पाहून माणिक निर्वंळ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे बाप-लेक बुडाले.

मृतदेह काढला बाहेर: घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या जवानाच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात गळ टाकून या बाप-लेकाचा शोध घेत मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेने परिसरात एकाच हळहळ व्यक्त केली जात होती.

शिवज्योत आणणे बेतले जीवावर: शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना फेब्रुवारी, 2022 रोजी घडली होती. कोल्हापूरातल्या भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर ही घटना घडली होती. ओंकार भीमराव पाटील (वय 19) असे या मृत तरुणाचे नाव होते. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

अशी घडली घटना: सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील पनुब्रे, वारूण या गावातील 30 ते 40 तरुण 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी गुरुवारी रांगणा किल्ल्यावर गेले होते. दिवसभर गडावरील स्वच्छता करून पुन्हा परत यायचे असे नियोजन होते. सर्वांनी स्वच्छता केली. त्यानंतर यातीलच 19 वर्षीय ओंकार हा येथील तलावाची स्वच्छता करून त्यामध्ये पोहण्यासाठी उतरला. मात्र अचनाक यामध्ये तो बुडाला. सोबत आलेल्या मित्रांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये तो सापडला नाही. शेवटी याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन पथकाला याबाबत कळविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध सुरू होती. शुक्रवारी सकाळी ओंकारचा मृतदेह सापडला. दरम्यान, या संपूर्ण घटनेची भुदरगड पोलिसांत नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा: Wagh Criticizes Sanjay Raut: सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा; चित्रा वाघ यांचे ताशेरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.