बीड - परळी तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजय सखाराम यमगर (वय-30 रा.दगडवाडी ता.परळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रस्त्याच्याकडेला रात्रीपासून एक स्कार्पिओ गाडी (एमएच-24 व्ही-5148) उभी होती. सकाळी शेतात जाणार्यांनी या गाडीमध्ये डोकावून पाहिले असता पाठीमागच्या सीटवर रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.
तत्काळ याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस उपअधीक्षक राहुल धस आणि परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजय यांचा पूर्ण कपडे रक्ताने माखलेले असून डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार खुनाचा असून सिरसाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.