ETV Bharat / state

दसरा मेळाव्यात अमित शाहांसमोर 'पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा'च्या घोषणा

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बोलत होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, उपस्थित नागरिकांनी 'पंकजा मुंडेंना सीएम करा' अशा घोषणा दिल्या.

भगवानगडावर अयोजित दसरा मेळावा
author img

By

Published : Oct 8, 2019, 6:43 PM IST

Updated : Oct 8, 2019, 7:25 PM IST

बीड - विजयादशमीनिमित्त भगवान भक्ती गडावर मंत्री पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान, भर कार्यक्रमात मुंडे यांच्या समर्थकांनी 'पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा' म्हणत 'सीएम....सीएम'च्या घोषणा दिल्या.

हेही वाचा - शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई

पंकजा मुंडे यांनी अमित शहांच्या नेतृत्वाखाली हा सीमोल्लंघनाचा सोहळा असल्याचे सांगितले. ही गर्दी भविष्याची दिशा बदलवणारी ठरेल. राष्ट्रभक्तीच्या धाग्याने सर्वांना एकत्र बांधले आहे. भगवानबाबांनी 'जमिनी विका पण शाळा शिका' असे सांगून भविष्याचे बीजारोपण केले, म्हणून आज ही पिढी समोर बसली आहे. लोकांच्या मतांवर नाही मनांवर विराजमान होणे महत्वाच असते. दरम्यान, भाजप सरकारने उसतोड कामगार महामंडळ तयार केले आहे. यामुळे पुढच्या पाच वर्षांत कामगारांना हातात कोयता उजलण्याची गरज पडणार नाही. भगवानगडावरील स्मारक सामान्यांची चैत्यभूमी, चेतनाभूमी बनली आहे. हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम नाही, ही भक्तीची शक्ती आहे. मी अहंकाराचा गड उतरुन खाली सावरगावात आले आणि हे नाते निर्माण केले. जनतेची इच्छाशक्ती भगवान बाबांच्या कर्मभूमीतून त्यांच्या जन्मभूमीत आम्हाला घेऊन आली. माझ्या नेतृत्वाने मला कर्तृत्वाची थाप दिली. तुमचा स्वाभिमान जपण्यासाठीच मी उभी आहे. जनतेच्या मनात आहोत म्हणूनच आम्ही आहोत. या प्रदेशातील लोकांच्या प्रेमाचे उपकार फेडू शकणार नाही. अमित शाहांनी माझा आणि भगवान भक्तांचा मान वाढवला आहे. असे म्हणत, गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करताना मला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले,' असे पंकजा यांनी म्हटले.

हेही वाचा - राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!

मेळाव्याला हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे, शिवसेनेचे नेते मंत्री जयदत्त क्षीरसागर, मंत्री महादेव जानकर, राधाकृष्ण विखे, राम शिंदे, खासदार डॉक्टर प्रितम मुंडे, यशश्री मुंडे, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, आमदार संगीता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, नमिता मुंदडा, रमेश पोकळे, आबालासाहेब दोडतले, बदामराव पंडीत आदींची उपस्थिती होती.

Intro:Body:

आम्ही ओबीसी ला संविधानिक अधिकार दिला- अमित शहा

भर कार्यक्रमात मुंडे भक्तांच्या सीएम...सीएम च्या घोषणा...

बीड- देशातील ओबीसी ला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भाजप सरकार ने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. खरतर आम्हीच ओबीसीला संविधानिक अधिकार प्राप्त करून दिला आहे.. असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले. भर कार्यक्रमात मुंडे भक्तानी 'पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा' म्हणत सीएम....सी एम च्या घोषणा दिल्या.

 पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. हरिभाऊ बागडे,मंत्री पंकजा मुंडे, शिवसेनेचे नेते मंत्री जयदत्त क्षीरसागर, मंत्री महादेव जानकर,राधाकृष्ण विखे, राम शिंदे, खा. डॉ. प्रितम मुंडे,यशश्री मुंडे ,आ. भिमराव धोंडे,आ. सुरेश धस,आ. संगिता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार,रमेश आडसकर, नमिता मुंदडा,रमेश पोकळे, आबालासाहेब दोडतले, बदामराव पंडीत आदींची यावेळी उपस्थिती होती.

अमित शहा म्हणाले भगवानबाबांच्या दर्शनासाठी आलोय. एका सुंदर स्मारकाची निर्मिती केली आहे. भगवानबाबांचे आयुष्य सामाजिक सुधारणांसाठी, वंचितांच्या शिक्षण, सन्मान आणि संघर्षासाठी होते.शिक्षणातुनच ओबीसींचे कल्याण होईल हा संदेश दिला. गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या मार्गावर चालुन वंचितांना न्याय दिला. आज पंकजा त्याच मार्गावर चालल्याआहेत. राज्यभरात भगवान बाबांचे भक्त पसरले आहेत. मोदींचे समर्थन करण्यासाठी हा जमाव इथे जमलाय. ३७० हटवुन देशाला एक केलय. तो संदेश घेऊन गावागावात जा. आमचं सरकार भगवानबाबांच्या विचारांवर चालतय. आम्ही ओबीसीला संवैधानिक दर्जा दिला. ओबीसींच्या नावावर राजकारण करणारांनी आतापर्यंत हे का नाही केले. बहुजन आणि ओबीसींच्या हितासाठी आम्ही काम करत आहोत. मी येथे राजकीय बोलणार नाही. मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय. प्रचाराला येईल तेव्हा राजकीय बोलेल.

मंत्री पंकजा मुंडे यांनी अमित शहांच्या नेतृत्वाखाली सिमोलंघनाचा हा सोहळा असल्याचे सांगितले. ही गर्दी भविष्याची दिशा बदलवणारी ठरेल. राष्ट्रभक्तीच्या धाग्याने सर्वांना एकत्र बांधले आहे.भगवानबाबांनी जमिनी विका पण शाळा शिका असे सांगुन भविष्याचे बिजारोपण केले. म्हणून आज ही पिढी समोर बसली आहे. लोकांच्या मतांवर नाही मनांवर विराजमान होणं महत्वाच असतं. उसतोड कामगार महामंडळ तयार केलय. पुढच्या पाच वर्षात हातात कोयता उजलण्याची गरज पडणार नाही. हे स्मारक सामान्यांची चैत्यभूमी, चेतनाभूमी बनली आहे. हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम नाही, ही भक्तीची शक्ती आहे. मी अहंकाराचा गड उतरुन खाली सावरगावात आले, आणी हे नाते निर्माण केले. जनतेची इच्छाशक्ती भगवान बाबांच्या कर्मभूमीतुन त्यांच्या जन्मभुमित आम्हाला घेऊन आली. माझ्या नेतृत्वाने मला कर्तृत्वाची थाप दिली. तुमचा स्वाभिमान जपण्यासाठीच मी उभी आहे. जनतेच्या मनात आहोत म्हणुनच आम्ही आहोत. प्रेमाचे उपकार फेडु शकणार नाही. अमित शहांनी माझा , या भगवान भक्तांचा मान वाढवला. मुंडेंचे स्वप्न पुर्ण करताना अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले.

राज्यभरातून लाखो लोक यावेळी उपस्थित होते.

दरम्यान या मेळाव्यापुर्वी सकाळी खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी मोटारसायकल रँली काढण्यात आली.

.

Conclusion:
Last Updated : Oct 8, 2019, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.