ETV Bharat / state

Beed : बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, सरकारकडून मदतीची मागणी...

author img

By

Published : Nov 6, 2022, 5:16 PM IST

जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कापूस लागवड झालेली आहे. त्यातच कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी परतीच्या पावसाला ( Return Monsoon ) मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. आणि हात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र बीड जिल्ह्यात ( Beed Disrtict ) यावर्षी पाहायला मिळत आहे. जे कापूस उत्पादन निघायला पाहिजे ते उत्पादन निघाले नाही आणि त्या मालाला अपेक्षेनुसार सध्या बाजारात भाव देखील मिळाला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

बीड : जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कापूस लागवड झालेली आहे. त्यातच कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी परतीच्या पावसाला ( Return Monsoon ) मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. आणि हात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र बीड जिल्ह्यात ( Beed Disrtict ) यावर्षी पाहायला मिळत आहे. जे कापूस उत्पादन निघायला पाहिजे ते उत्पादन निघाले नाही आणि त्या मालाला अपेक्षेनुसार सध्या बाजारात भाव देखील मिळाला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे.

मोठ्या प्रमाणात नुकसान - गेल्या वर्षी कापूसाला जास्त भाव मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली आहे. सध्या कापसाची एक वेचनी झाली त्यानंतर सगळ्या कापसाचे खराटे झाले आहेत. खायचे वांदे झाले आहेत, लेकरा बाळांचा खर्च आहे सगळा प्रपंच चालवायचा कसा आता काय बोलू हेच मला कळत नाही. कापसाची बॅग घ्यायची म्हटले तर 1 हजार रुपयाला, कापसाला पाळी 1500 रुपये रोज घेत होते, कापूस वेचणीला 10 रुपये प्रति किलो द्यावा लागत आहे. एका खुरपणीला दीड हजार रुपये खर्च झाला, अशा 3 खुरपणी झाल्या आहेत. खुरपणीला तीन ते चार हजार रुपये खर्च आला आहे... आतापर्यंत तीस हजार रुपये खर्च झाला आहे... तीस हजार रुपयांचा कापूस होणार नाही. गेल्या वर्षी 15000 रुपये भाव होता, आता सात ते आठ हजार रुपये भाव आहे. त्यामुळे आता करायचे काय हाच प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्याचे, शेतकरी गणेश कुटाळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

शासनाने योग्य भाव द्यावा - कापसाची बॅग घ्यायला एक हजार रुपये खर्च येतो. पाळी घालायला प्रति दिवस 1000 रुपये रोज द्यावा लागतो. प्रति फवारणी 1000 रुपये तीन ते चार फवारण्या झाल्या आहेत. सध्या कापूस वेचणीला दहा रुपये किलो कापूस द्यावा लागत आहे, पहिली 21 नि झाली त्याच्यानंतर पुन्हा कापसाला काहीच शिल्लक राहिले नाही त्यामुळे आम्ही काय करावे. यावर्षी पंधरा हजार रुपये भाव आता यावर्षी मात्र भाव नसल्याने आम्ही अडचणीचा सापडले आहेत. यावर्षी जरी उत्पन्न कमी झाले असले तरी शेतकऱ्यांना शासनाने चांगला भाव दिला पाहिजे, अशी आमची शासनाला विनंती असल्याची महिला शेतकरी गौरी गणेश खुटाळे यांनी सांगितले.

आम्ही शेतात फुकट राबायचे का ? - कापसाच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी आता दुसरे पीक घ्यायचे म्हटले तर दुसऱ्या पीकांची पीक पेरणी करायला खूप खर्च करावा लागतो. तसेच निसर्गाने साथ दिली नाही तर त्याही पीकांचे नुकसान होते. कापसाच्या पीकावर पेरणी पासून ते वेचणी पर्यंत खूप खर्च करावा लागताे. यामुळे आम्हाला परवडत नाही. म्हणून सरकारने 15 हजारापर्यंत भाव दिला पाहिजे. शेतात मेहनत करूनही जर अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नसतील तर आम्ही शेतात फुकट राबायचं का ? असा प्रश्न महिला शेतकरी कमलबाई खुटाळे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.