ETV Bharat / state

शिवसेनेत नव्या-जुन्याचा वाद; गटबाजीला रोखण्याचे पक्षश्रेष्ठी समोर आव्हान - सचिन मुळूक

सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. नवा व जुना शिवसैनिक असे दोन गट कायम असलेल्या शिवसेनेत आता टोकाचा संघर्ष होत असल्याचा बीड जिल्ह्यात वारंवार येत आहे. नव्याने शिवसेनेच्या बीड जिल्हा प्रमुख पदी आप्पासाहेब जाधव यांची निवड होताच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. माजलगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख जाधव यांच्या रॅलीदरम्यान शिवसेना शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांनी रडा केला.

shivsena
shivsena
author img

By

Published : Jun 25, 2021, 8:06 AM IST

बीड - सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. नवा व जुना शिवसैनिक असे दोन गट कायम असलेल्या शिवसेनेत आता टोकाचा संघर्ष होत असल्याचा बीड जिल्ह्यात वारंवार येत आहे. नव्याने शिवसेनेच्या बीड जिल्हा प्रमुख पदी आप्पासाहेब जाधव यांची निवड होताच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. माजलगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख जाधव यांच्या रॅलीदरम्यान शिवसेना शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांनी रडा केला.

जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी दोन जिल्हा प्रमुख आहेत. यामध्ये परळी, माजलगाव, अंबाजोगाई केज व धारूर तालुक्याचा सांभाळत असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांचे तात्काळ जिल्हाप्रमुखपद पक्षश्रेष्ठींनी काढून घेतले व त्यांच्या जागी दोन वर्षापूर्वी शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी दाखल झालेले माजलगाव येथील अप्पासाहेब जाधव यांच्याकडे दिले. यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शिवसेनेत नव्या-जुन्या शिवसैनिकांचा मुद्दा चव्हाट्यावर आला. तसे पाहिले तर नव्याने पक्षात आलेल्या एखाद्या व्यक्तीला पक्षात घेवून पक्षाची महत्वाची पदे देण्याचे शिवसेनेत नवीन नाही. याचाच परिणाम माजलगाव येथे शिवसेनेच्या माजलगाव शिवसेना शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांनीच नव्याने जिल्हा प्रमुख झालेले अप्पासाहेब जाधव यांच्या रॅलीत घुसून गाडीवर वंगण टाकण्याचा प्रयत्न केला. यातून शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.

जिल्ह्यात शिवसेनेत अनेक मातबर नेते कार्यरत आहेत. मात्र त्यांना देखील या नव्या-जुन्या शिवसेनेतील वादाचा फटका बसलेला आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्ह्यात शिवसेनेला याचा येणाऱ्या निवडणूकांमध्ये मोठा फटका बसेल. बीडच्या राजकारणात मोठे योगदान असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेतच आहेत. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा बीड मतदार संघातून पराभव झाला होता. यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येऊनही माजी मंत्री क्षीरसागर यांना शिवसेनेत महत्वाची कामगीरी मिळालेली नाही. असे असले तरी शिवसेनेतील मराठवाड्यातील एक महत्वाचे नेते म्हणून माजी मंत्री क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा शिवसेनेतील गट सक्रिय आहे. मात्र पक्षाकडून त्यांच्याकडे कुठलीही महत्त्वाची जबाबदारी सध्या तरी दिलेली नाही. महत्वाचे म्हणजे जयदत्त क्षीरसागर हे संस्थानिक आहेत. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा थेट संपर्क आहे.
एकंदरीतच बीड जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजी पक्षश्रेष्ठींनी रोखली नाही तर याचा लाभ राष्ट्रवादी घेवू शकते. सध्या बीडच्या शिवसेनेत नाराजांचा एक मोठा गट निर्माण होत आहे. ही वस्तूस्थिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.