ETV Bharat / state

बीड : चांदापूर येथे सातव्या बौद्धधम्म परिषदेचा समारोप

author img

By

Published : Feb 9, 2021, 6:32 PM IST

चांदापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 8 फेब्रुवारीरोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा समारोप आज करण्यात आला. या समोरोपीय कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

concluding-seventh-buddhist-conference-at-chandapur-in-beed
बीड : चांदापूर येथे सातव्या बौद्धधम्म परिषदेचा समारोप

परळी वैजनाथ (बीड) - परळी तालुक्यातील मौजे चांदापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 8 फेब्रुवारीरोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा समारोप आज करण्यात आला. या समोरोपीय कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या परिषदेची सुरवात सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे धम्म ध्वजारोहणाने झाली होती.

धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी 25 हजार रूपये -

यावेळी बोलताना, आमदार संजय दौंड यांनी चांदापूर येथील तक्षशिला बौद्धधम्म प्रतिष्ठाणला आपण यापुढील काळात सर्वोतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच या परिसराच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच धम्म परिषदेच्या आयोजनासाठी दरवर्षी 25 हजार रूपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

धम्म विचाराने परिवर्तन शक्य -

यावेळी पुज्य भंते उपगुप्त महाथेरो यांनी हे निसर्गरम्य ठिकाण असल्याचे सांगून धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करावे. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू तसेच उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - शशी थरुर यांच्यासह पत्रकारांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.