ETV Bharat / state

बीडमध्ये वाळू माफियावर जिल्हाधिकाऱ्यांनी उगारला कारवाईचा बडगा; २ हजार ब्रास ताब्यात - वाळू माफिया

बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेंनी आज गेवराई येथील वाळू पट्ट्यात जाऊन वाळू टिप्पर ताब्यात घेऊन कारवाई केली.

जिल्हाधिकारी अस्तिक पांडे
author img

By

Published : Apr 24, 2019, 11:36 PM IST

बीड - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी आज गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यात जाऊन वाळू टिप्पर ताब्यात घेऊन कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत जिल्हाधिकारी यांनी २ हजार ब्रास वाळू ताब्यात घेतली आहे.

जिल्हाधिकारी अस्तिक पांडे

बीडमध्ये १६ ते १७ वाळू पट्टे आहेत. यामध्ये ३ ते ४ वाळू पट्टे वगळता इतर वाळू पट्ट्यांचा अद्यापपर्यंत लिलाव झालेला नाही. मात्र, तरी देखील वाळू माफिया सर्रासपणे वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे याच्या तक्रारी बीडचे जिल्हाधिकारी पांडे यांच्याकडे आल्यानंतर बुधवारी त्यांनी स्वतः गेवराई तालुक्यातील राजापूर पट्ट्यात जाऊन टिप्पर मध्ये वाळू भरताना रंगेहात वाहने पकडली. यामुळे वाळूमाफियांचा मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱयांनी अचानक वाळू पट्ट्याला भेट दिल्यामुळे १५ ते १६ टिप्पर अवैध मार्गाने वाळू वाहतूक करताना आढळून आले. एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे राजापूर येथील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची मिलीभगत समोर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro: खालील बातमी मधील फोटो मेलवर सेंड केले आहेत....
********************

बीड मध्ये वाळू माफिया वर जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी उगारला कारवाईचा बडगा; दोन हजार ब्रास वाळू घेतली ताब्यात

बीड- जिल्ह्यातील वाळू पट्ट्यातून चोरट्या मार्गाने शेकडो ब्रास वाळू चोरीला जात आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर स्वतः बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यात जाऊन वाळू टिप्पर ताब्यात घेऊन कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत जिल्हाधिकारी यांनी दोन हजार ब्रास वाळू ताब्यात घेतली आहे.

Body:बीड जिल्ह्यात 16 ते 17 वाळू पट्टे आहेत. यामध्ये तीन ते चार वाळू पट्टे वगळता इतर वाळू पट्ट्यांचा अद्याप पर्यंत लिलाव झालेला नाही. असे असताना देखील वाळूमाफिया सर्रास वाळू उपसा करत असल्याच्या तक्रारी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे आल्यानंतर बुधवारी पांडे यांनी स्वतः गेवराई तालुक्यातील राजापूर पट्ट्यात जाऊन टिप्पर मध्ये वाळू भरताना रंगेहात वाहने पकडली. यामुळे वाळूमाफियांचा मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी यांनी अचानक वाळू पटियाला भेट दिल्यामुळे पंधरा ते सोळा टिप्पर अवैध मार्गाने वाळू वाहतूक करताना आढळून आले एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे राजापूर येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांची मिलीभगत समोर आली आहे आता जिल्हाधिकारी पांडे हे संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Conclusion:या कारवाईनंतर जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी स्वतः राजापूर परिसरातील वाळू पट्ट्यात आलेलो आहे. येथे वाळू टिप्पर मध्ये भरताना काही वाहने आढळून आली. हे टिप्पर ताब्यात घेतले असून यावर योग्य ती कारवाई ई केली जाणार आहे. यापुढे जर कोणी अवैध मार्गाने वाळू उपसा करत असेल तर त्यांच्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल असे जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.