बीड - 'चाईल्ड पॉर्नोग्राफी क्लिप' बनवून क्लिप फेसबुकवर व्हायरल केल्याप्रकरणी बीडमध्ये आय. टी. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. लहान मुलाच्या बाबतीत लैंगिक चित्रफित बनवली व ती क्लिप फेसबुकवर शेअर केली होती. याची माहिती बीड पोलिसांना कळताच त्या संबंधित 'चाईल्ड पॉर्नोग्राफी क्लिप' बीड पोलीस विभागाच्या सायबर सेलमध्ये जमा करून घेतल्या आहेत. त्या क्लिप बनवणाऱ्या आरोपींचा शोध बीड पोलीस घेत असून लवकरच त्या विकृत कृत्य करणाऱ्यांना जेरबंद करण्यात येईल, असेही हर्ष पोद्दार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - मंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचे समोर येत आहे. चक्क 'चाईल्ड पॉर्नोग्राफी क्लिप' बनवून फेसबुकवर व्हायरल केल्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. याची माहिती बीड पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी ते व्हिडीओ क्लिप सायबर सेलमध्ये सेव करून आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर त्या क्लिप बनविणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांना लागला असून, त्या आरोपींवर बीड पोलीस लक्ष देऊ असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सोमवारी सांगितले.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निधी दिला नाही; मात्र, असलेला निधी पळवून नेला'