ETV Bharat / state

Sharad Pawar Attack On Modi : केंद्रातील सरकार विश्वासपात्र नाही, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपासह राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर बीडमध्ये शरद पवार यांची पहिलीच सभा आज झाली. यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रातील सरकारने विरोधी सरकारे पाडण्याचे उद्योग सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sharad Pawar Attack On Modi
Sharad Pawar Attack On Modi
author img

By

Published : Aug 17, 2023, 5:53 PM IST

Updated : Aug 17, 2023, 8:41 PM IST

शरद पवारांचे भाषण

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये शरद पवार यांचे जंगी स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर बीडमध्ये शरद पवार यांची ही पहिलीच सभा आहे. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर नाव न घेता टीका केली आहे. सत्तेच्या मागे जा, पण माणुसकी विसरू नका, असा हल्लाबोल शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांवर केला आहे.

  • Beed, Maharashtra | NCP chief Sharad Pawar says, "On 15th August, PM Modi said 'Mi Punha Yein' (I’ll come back again) I want to tell him a similar thing was said by Maharashtra's former CM Devendra Fadnavis & he came to power but at a lower post." pic.twitter.com/MecIn1hxJ9

    — ANI (@ANI) August 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींना महिलांचे दुःख कळत नाही का : शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणात की, मी पुन्हा येणार पण मुख्यमंत्री म्हणून नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पुन्हा येणार असल्याचे सांगत आहेत. मणिपूर, नागालँडसारखी महत्त्वाची राज्ये चीन, पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. तेथून देशावर कधीही संकट येऊ शकते. मात्र केंद्र सरकारला अजिबात देशाची काळजी नाही. मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिलासा देण्याची गरज होती. मात्र मोदींनी तिकडे जायची तसदीही घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांचे दुःख कळत नाही का?, असा सवाल देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.

विरोधी सरकार पाडण्याचे भाजपाचे उद्योग : विरोधकांची सरकार पाडण्याचे उद्योग केंद्राने सुरू केले आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारला अडचणीत आणण्याचे काम भाजपा करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेचा वापर करून सर्वसामान्यांचे सरकार पाडण्याचे काम करीत असल्याचा प्रहारदेखील पवारांनी मोदींवर केला आहे. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश भाजपाने सरकार पाडले. एकीकडे भाजपा स्थिर सरकार देण्याचे अवाहन करते आहे. मात्र, दुसरीकडे विरोधकांचे सरकार पाडण्याचे काम सुरू आहे. ही भाजपाची अतिशय वाईट चाल असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

माझे वय झाले म्हणणाऱ्यांनी काय बघितले : बीड जिल्ह्यातील काही नेत्यांनी सहकाऱ्यांसह पक्ष सोडला आहे. ते म्हणाले की, पवार साहेबांचे वय झाले तर आपल्याला दुसरा देता निवडणे गरजेचे आहे. माझे वय झाले म्हणणाऱ्यांनी माझे काय बघतले. जे आम्हाला सोडून गेले त्यांना माझा एकच सल्ला आहे. त्यांनी सामान्य माणसांचा विश्वास गमावू नये. पवार यांनी नाव न घेता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा या शब्दात समाचार घेतला.

सरकारची बघ्याची भूमिका : ठाण्यातील कळव्यात सरकारी रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाला. त्यावर राज्य सरकार नुसतीच बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. गैरकृत्यांवर पांघरूण घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सत्तेचा दुरुपयोग करणार्‍यांना उलथवून टाकण्यासाठी प्रत्येकाने भूमिका बजावली पाहिजे, असे अवाहन देखील शरद पवारांनी सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar in Beed : शरद पवारांच्या 'त्या' इशाऱ्याकडे अजित पवार गटाचे दुर्लक्ष, बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा सुरू
  2. Sandeep Kshirsagar On Sharad Pawar Meeting : बीडची सभा ऐतिहासिक होणार, लोक उस्फुर्तपणे सभेसाठी येत आहेत - संदीप क्षीरसागर
  3. Sanjay Raut on Sharad Pawar Photo : गुरुदैवताच्या पाठीत खंजीर खुपसता आणि त्यांचाच फोटो लावता; संजय राऊतांनी फटकारले

Last Updated : Aug 17, 2023, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.