अंबाजोगाई - येथील पूजा गुलाबराव सिरसट यांनी आपला वाढदिवस सेवाभावे साजरा केला. त्यांनी येथे लोखंडी सावरगांव कोविड रुग्णालयास वाफेच्या मशीन देवून आपला वाढदिवस साजरा केला.
सध्या जगभर कोरोना आजाराची मोठी लाट आहे. यामध्ये सर्व स्थरावर मदतीची आवश्यकता आहे. छोटी-मोठी मदतसुध्दा आज मोठ्या प्रमाणात गरजेची आहे. या पार्श्वभूमिवर येथील पूजा गुलाबराव सिरसट यांनी आपला वाढदिवस सेवाभावे साजरा केला. यामध्ये त्यांनी १० मे रोजी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयातील रूग्णांच्या उपचारासाठी वाफेच्या मशीन दिल्या. या कामातून पूजा यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे दिसत आहे. सध्या आपल्या वाढदिवसाला मोठा व्यर्थ खर्च करणारे लोक मोठ्या प्रमाणात असताना असे सेवाभावी लोकही आहेत ही आनंदाची बाब ठरत आहे. पूजा यांनी गेल्यावर्षी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त परीसरातील गरजू कुटूंबिय यांना अन्न-धान्य आणि महिलांना साड्या वाटप केल्या होत्या. यावर्षीही त्यांनी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयातील रूग्णांच्या उपचारासाठी वाफेच्या मशीन दिल्या. यावेळी रूग्णालयाच्या अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे, मेडिकल ऑफीसर डॉ.डी.पी.गायकवाड, डॉ.केंद्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर सिरसट, उत्तम डोंगरे, प्रा.रवि शिंदे, डॉ.बाबासाहेब शिंदे, गुलाबराव सिरसट, केशर सिरसट, प्रा.प्रशांत मस्के, शैलेश ढोबळे, अहमद सय्यद, अक्षय सिरसट, हर्षवर्धन शिंदे आदींची उपस्थिती होती.
सर्वांनीच वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळावा
जीवनात अनेक लोकांना आपल्या जीवनाचा आनंद देखील मिळत नाही. राज्यात सर्वञ कोविडचा प्रादुर्भाव आहे. तर, अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच माझे तरूणाईला आवाहन आहे की, आपणच उद्याचे भविष्य आहात. आपण सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रूग्णालय, दुष्काळग्रस्त, शेतकरी, शाळा, अंध, दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा. जेणेकरून सामाजिक भान जपण्याचे कार्य आपल्या हातून घडेल असे पूजा सिरसट म्हणाल्या. यावेळी बोलताना अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे म्हणाल्या की, सध्या सगळीकडेच तरूण मुले-मुली हे वाढदिवसाला अनावश्यक खर्च करतात. अशा काळात पूजा सिरसट या ताईने आपल्या वाढदिवसानिमित्त परिवाराचा वारसा जोपासत वेळोवेळी गोरगरीब रूग्ण, तसेच गरजूंना मदत करण्याचे नुसते ठरवलेच नाही. तर सामाजिक भान जपण्याचेही काम केले आहे. येथील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांनी पुजा यांना ही मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले.
हेही - 'देशातील कोरोनाच्या स्थितीसाठी संपूर्णपणे मोदीच जबाबदार'