ETV Bharat / state

बीड : मारहाण करत 3 तोळे सोन्यासह रोकड पळवली - ash was stolen along with 3 tole of gold in Beed

घराचा दरवाजा तोडून तीन तोळे सोन्यासह 13 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्हयातील खिळद येथे घडली.

crime
crime
author img

By

Published : Dec 17, 2020, 7:27 PM IST

बीड - घराचा दरवाजा तोडून तीन तोळे सोन्यासह 13 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्हयातील खिळद येथे घडली. घरातील लोक जागे होताच मारहाण करून चोरट्यांनी पळ काढला. अंभोरा पोलीस ठाण्यात राजु पोपट वनवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, खिळद येथील वनवे वस्तीवर राजु पोपट वनवे याचे घर आहे. ते आपल्या कुटुंबासह झोपले असता मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शेजारील घरांना बाहेरून कड्या लावुन त्याच्या घराचा दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. दरवाजा उघडताच राजुला जाग आली त्याने इकडे तिकडे पहाताच त्याला मारहाण करून घरात डब्यात ठेवलेले तीन तोळे सोने व 13 हजार रूपये रोख असा एकुण 97 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात राजु वनवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.