बीड - नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथ यांच्या संजीवनी समाधीचा सोहळा मायंबा (ता.आष्टी) येथे दरवर्षी गुढी पाडव्याच्या एक दिवस आगोदर होत असतो. याठिकाणी मोठी याञा असते. लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. परंतू, यावर्षी कोरोना व्हायरसमुळे हा याञा उत्सव होणार नसल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त तथा आमदार सुरेश धस यांनी दिली.
मच्छिंद्रनाथ गडावर 24 मार्चला सोहळ्यास प्रारंभ होणार होता. मच्छिंद्रनाथांनी पौष अमवस्येच्या दिवशी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे दरवर्षी या दिवशी राज्यभरातून लाखो नाथ भक्त येथे दर्शनाला येतात. नाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही काळ सावरगाव येथे वास्तव्य केले. त्यावेळी त्यांनी भिक्षा मागून शुद्ध तुपात रोट बनवले होते. त्यामुळे आजही प्रसादासाठी रोट बनविण्याची परंपरा कायम आहे. यात्रेपूर्वी गावातून शिधा जमा करून गडावरील देव तलावाजवळ रोट तयार केले जातात. हा प्रसाद भाविक घरातील धान्यात किंवा पैशाच्या कपाटात ठेवतात. या याञात्सोवास राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. परंतू, यावर्षी हा याञाउत्सोव कोरोना व्हायरसमुळे होणार नसल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.