ETV Bharat / state

Buddha Purnima : गौतम बुद्धांची 2567 वी जयंती होणार बीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी; आज जगाला बुद्धांच्या विचारांची गरज- भिकू धम्म शील

'सुखो बुद्धान उप्पादो, सुखा सद्धम्मदेसना... सुखा संघस्स संघस्स सामग्गी, समग्गानं तपोसुखो...' या म्हणीप्रमाणे जगाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2567 जयंती देशासह जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. गेली अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला अहिंसेपासून दूर करण्याचे काम ज्या महामानवाने केले, त्या महामानवाची जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात आनंदाने साजरी होताना पाहायला मिळत आहे. याविषयी ईटीव्ही भारतच्या या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेवू या.

author img

By

Published : May 4, 2023, 10:11 AM IST

Updated : May 5, 2023, 6:22 AM IST

Buddha Purnima 2023
गौतम बुद्ध यांची जयंती
जगाला शांती, करुणा, मैत्रीचा संदेश गौतम बुद्धांनी दिला- भिकू धम्म शील

बीड : वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा होय. जागतिक स्तरावर या पौर्णिमेला फार महत्त्व आहे. कारण जगाला शांती, करुणा, मैत्रीचा संदेश ज्या तथागत गौतम बुद्धांनी दिला आहे. त्या बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण तीन घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. बोधी सत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवीसन पुर्व 563 मध्ये लुंबीनी या ठिकाणी झाला. ती पोर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा होय. तथागत गौतम बुद्ध यांनी 29 वर्ष घरामध्ये राहून त्यानंतर गृह त्याग केला.

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा : सहा वर्ष खडतर तपश्चर्या करून खडतर परिश्रम केले. या तपश्चर्येअंती त्यांनी वैराग्य धारण केले. वैराग्य धारण करून वैराग्याची कसोटी घेऊन, त्यांनी साधनेला सोडून खऱ्या अर्थाने चिंतनाला सुरुवात केली. तेव्हा त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, जे संबोधी म्हटल्या जाते. त्यांना बुद्धीत्व म्हटल्या जाते. ती सर्वज्ञासी अवस्था आहे. ती अवस्था म्हणजे ज्ञान प्राप्त होय. ही ज्ञानप्राप्ती तथागत गौतम बुद्धांना याच वैशाख पौर्णिमेला बुद्धगया या ठिकाणी बोधी वृक्षाखाली झाला. तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे. यानंतर तथागत समूख गौतम बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान निरंतरपणे 45 वर्षापर्यंत या जगाला वाटण्याचे काम त्यांनी केले.

गौतम बुद्धाचे 80 व्या वर्षी महानिर्वाण : 45 वर्ष जेवढे होईल तेवढ्या भागामध्ये जाऊन तथागत गौतम बुद्धांनी पायपीट करून खेड्यापाड्यांमध्ये वाडी वस्तीवर जाऊन ग्रामीण भागात जाऊन छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आपला बुद्ध धम्माचा विचार दिला. त्यांनी संपूर्ण जगाला बुद्ध धम्माचा विचार दिला. देशातून अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड, दैववाद, ईश्वर वाद, या सर्वांवर गौतम बुद्धांनी घनाघात केला. आयुष्यातील 45 वर्ष जो धम्म दिला, त्या विचाराने हजारो लाखो लोक प्रेरित झाले, बुद्धमय झाले. वयाच्या 80 व्या वर्षी उत्तर भारतातील कुशीनगर या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचे 80 व्या वर्षी महानिर्वाण झाले.

बुद्धांच्या विचारांची गरज : भगवान बुद्धाच्या जीवन काळातील त्यांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला झाल्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. हा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जर बुद्ध या जगात जन्माला आले नसते, तर खऱ्या अर्थाने फार अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आजही चालूच राहिल्या असत्या. ज्यामुळे देश लयास केला असता जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती नांदत आहे. अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला, आज बुद्धांच्या विचारांची गरज आज जगाला आहे. युद्ध नको बुद्ध हवा आम्हाला, असे संपूर्ण जग म्हणत आहे. जगातील लोक ही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करतात.

बुद्ध जगण्याचा मार्ग : बुद्धांचे विचार हे संपूर्ण मानव जातीसाठी आहेत. भगवान बुद्धांनी आपले विचार हे सर्वसामान्य देताना जात-पात धर्म ऊच नीच असे कधीही पाहिले नाही. ज्याला सुखी व्हायचा आहे, ज्याला समाधानी व्हायचे आहे, ज्याला आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, अशा व्यक्तीने निश्चितच बौद्ध धर्माकडे यावे. बुद्धाच्या विचारांमध्येच जगाचे सुख सामावले आहे. बुद्धांच्या विचारांमध्येच जगाची शांती सामावली आहे, ज्याला ज्याला शांतीने जगायचे आहे, त्याने बुद्धांचे विचार धारण करावेत. प्रत्येकाचे बुद्ध विचारांमध्ये स्वागत आहे. जात नाही धर्म नाही बुद्ध विचार आहे. बुद्ध जगण्याचा मार्ग आहे.

सुआचरण केल्यानंतरच सुखाची प्राप्ती : बुद्ध धर्मामध्ये कोणत्याही जात, पंथ, वंशाचा माणूस धम्मामधे येऊ शकतो. बुद्धाचा धम्म स्वीकारताना एकच आपण लक्षात घेतले पाहिजे. बुद्धाचा धम्म हा आचरणाचा धम्म आहे. इथे तुम्हाला सुआचरण केल्यानंतरच सुखाची प्राप्ती होते. मलाही आपल्या जीवनामध्ये सुखी व्हायचे आहे, तो कोणीही असो ज्याला माणूस म्हणून या जगामध्ये जगायचे आहे. सुख शांतीला ज्याला प्राप्त करायचे आहे. त्याने बुद्ध धम्माला आपल्याशी करावे.

हेही वाचा : Buddha Purnima 2023 : बुद्ध पौर्णिमेला येत आहे हा अनोखा योगायोग, जाणून घ्या सविस्तर माहिती

Last Updated : May 5, 2023, 6:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.