ETV Bharat / state

गेवराईच्या राक्षसभुवनमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज दुपारी घडली. मृत अविनाश आज सकाळी राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत आणखी काही मुलेही होती. परंतु जास्त पोहता येत नसल्यामुळे अविनाशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

boy-drowned-in-gevrai-beed
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Nov 7, 2020, 5:25 PM IST

बीड - जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज दुपारी घडली. तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अविनाश जगदीश नाटकर (वय 18) असे मृताचे नाव आहे.

पोहता येत नसल्याने बुडाला तरुण

मृत अविनाश आज सकाळी राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत आणखी काही मुलेही होती. परंतु जास्त पोहता येत नसल्यामुळे अविनाशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती चकलांबा पोलिसाना मिळताच पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंर्जुेडे यांच्यासह पोलीस, बीडच्या अग्नीशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोध घेतल्यानंतर दुपारी एक वाजता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला.

हेही वाचा - मंगळवेढा तालुक्यात शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

हेही वाचा - आंबेगावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृ
त्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.