ETV Bharat / state

Beed Crime News : अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; माणुसकीला काळीमा फासणारी घटना - बीडमध्ये लैंगिक अत्याचार

बीडमध्ये अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. घटनास्थळावर आढळले रक्ताचे डाग आढळून आले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यात आज पहाटे एकावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Beed Crime News
अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Feb 22, 2023, 9:57 AM IST

Updated : Feb 22, 2023, 3:29 PM IST

3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

बीड : पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना बीडमध्ये समोर आली आहे. शहरात मागून खाणाऱ्या अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुकलीला, खाऊचे अमिश दाखवून उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरातील क्रीडांगणाच्या परिसरात असणाऱ्या शौचालयामध्ये रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावर रक्ताचे डाग देखील आढळून आले आहेत. बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनेने आणखी त्यात भर पडली आहे.

खाऊच आमिष दाखवून केला अत्याचार : प्राथमिक माहितीवरून 3 ते 4 नराधमांनी त्या चिमुकल्या मुलीला खाऊच आमिष दाखवून या क्रीडांगणाच्या शौचालयाच्या परिसरात नेल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पीडित मुलगी ज्या वेळेस मोठमोठ्याने ओरडायला लागली. त्यानंतर हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्या ठिकाणाहून नराधम अज्ञातांनी तिथून धूम ठोकली. या घटनेची माहिती कळताच, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम घटनाथळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत, पीडित चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पीडित चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आज पहाटे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात आरोपीवर कलम 376, पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : तीन ते चार जण त्या ठिकाणी होते, मुलीने आरडाओरड केल्यावर ते पळत गेले. अशी प्राथमिक माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात एक आरोपी होता का, तीन ते चार जण सहभागी होते? याचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मागून खाणाऱ्या एका अंध महिलेच्या चिमुकल्या मुलीला उचलून नेऊन अत्याचार केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे? अशा गुन्हेगारांना कडक शासन करायला हवे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : महिलांना व्हिडिओ कॉल करून दाखवायचा प्रायव्हेट पार्ट, वाचा काय झाले पुढे....

Last Updated : Feb 22, 2023, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.